चित्रपटसृष्टीला आणखी एक धक्का! ‘हॉरर’ चित्रपटासाठी ओळखले जाणारे कुमार रामसे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन


बॉलिवूड चित्रपटसृष्टीला एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. नुकतेच सदाबहार अभिनेते दिलीप कुमार यांचे निधन झाले होते. त्यांच्या निधनातून लोक सावरले नव्हते, तोच आणखी एक वाईट बातमी आली आहे. हॉरर चित्रपटासाठी प्रसिद्ध असलेले निर्माते कुमार रामसे यांचे निधन झाले आहे. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. ते ८५ वर्षांचे होते. ते रामसे ब्रदर्समधील सर्वात मोठे होते. माध्यमांतील वृत्तानुसार, मुंबईच्या हिरानंदानी येथील राहत्या घरी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानंतर चाहत्यांपासून कलाकारांपर्यंत सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.

हॉरर चित्रपटांची पटकथा लिहिणारे कुमार रामसे यांच्या पश्चात पत्नी शीला आणि तीन मुले राज, गोपाल आणि सुनील आहेत. मुलगा गोपालने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (८ जुलै) सकाळी साडे पाच वाजता हृदयविकाराचा झटका बसल्याने त्यांचे निधन झाले आहे. चित्रपट निर्माते एफयू रामसे यांचे मोठे सुपूत्र कुमार रामसे हे सात भावांमध्ये सर्वात मोठे होते. या भावांनीच हॉरर चित्रपट बनवले होते. हॉरर चित्रपटांसाठी त्यांना ओळखले जाते. (Filmmaker Kumar Ramsay Passes Away Due To Heart Attach He Was The Eldest of Ramsay Brothers)

माध्यमांतील वृत्तानुसार, १९४७मध्ये फाळणीनंतर एफयू रामसे यांचे कुटुंब मुंबईत आले होते. इथे रामसे भावंडांनी इलेक्ट्रॉनिक्सचे दुकान सुरू केले. मात्र, मायानगरीत राहून ते चित्रपटसृष्टीकडे वळले. आपल्या वडिलांसोबत सात भावंडांनी चित्रपट बनवण्याचे काम सुरू केले होते. वेगळी शैली पकडत त्यांनी आपली एक वेगळीच ओळख निर्माण केली होती.

हॉलिवूडच्या हॉरर चित्रपटांमध्ये भारतीय तडका टाकत या भावंडांनी भूतांच्या अनेक कहाण्यांवर चित्रपट बनवत प्रेक्षकांना चित्रपटगृहात घाबरवले. ७०-८० च्या दशकात कमीत कमी बजेटमध्ये अनेक शानदार चित्रपट देणारे रामसे ब्रदर्समध्ये कुमार हे स्क्रिप्ट सांभाळायचे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची भरपूर पसंती मिळायची. रामसे ब्रदर्सच्या चित्रपटांमध्ये ‘और कौन?’, ‘दहशत’, ‘साया’, ‘खोज’ आणि ‘पुराना मंदिर’ यांसारख्या अनेक चित्रपटांचा समावेश आहे. ‘साया’ चित्रपटात शत्रुघ्न सिन्हा होते, तर ‘खोज’ या चित्रपटात ऋषी कपूर आणि नसीरुद्दीन शाह होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नसीरुद्दीन शाह यांना ८ दिवसांनी मिळाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, मुलाने फोटो शेअर करत दिली माहिती

-कियारासाठी वयस्कर व्यक्तीने गाडीचा दरवाजा उघडत ठोकला सलाम; नेटकरी म्हणाले, ‘तुझ्या वडिलांपेक्षा जास्त…’

-अजय देवगणच्या ओटीटी पदार्पणासोबतच कमबॅक करणार ‘ही’ अभिनेत्री; कित्येक वर्षांपासून आहे मोठ्या पडद्यापासून दूर


Leave A Reply

Your email address will not be published.