हिंदी चित्रपट जगतातील अनेक अभिनेत्री त्यांच्या चित्रपटातील अभिनयापेक्षा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन त्या नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करत असतात ज्यावर त्यांचे चाहतेही भरभरुन प्रतिक्रिया देताना दिसतात. या बोल्ड आणि बिंनधास्त अभिनेत्रींच्या यादीत दिशा पटानीच्या (Disha Patani) नावाचा प्रामुख्याने समावेश होतो आपल्या हॉट फोटोंनी ती नेहमीच सोशल मीडियावर कहर करत असते. सध्या तिच्या अशाच बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. ज्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.
याबाबत संपूर्ण माहिती अशी की, दिशा पटानी ही बॉलिवूड जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि घायाळ करणाऱ्या सौंदर्याने तिने हिंदी चित्रपट जगतात स्वतःची विशेष ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे आणि घायाळ करणाऱ्यान सौंदर्याचे चित्रपट जगतात नेहमीच कौतुक होत असते. अत्यंत कमी वेळात दिशाने लोकप्रियता मिळवली आहे. आपल्या चित्रपटांइतकीच ती सोशल मीडियावरही नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियावरही तिचा मोठा चाहता वर्ग आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरुन ती नेहमीच तिचे बोल्ड फोटो शेअर करत असते. अलिकडेच तिने एक बोल्ड फोटोशूट केले आहे ज्याचे काही फोटो तिने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केले आहेत.
दिशा पटानीच्या या व्हायरल फोटोंमध्ये गुलाबी रंगाची बिकीनी घातलेल्या दिशाने बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा पार केल्या आहेत. केस मोकळे सोडून गुलाबी रंगाच्या बिकीनीमध्ये दिशाने मादक अदा दिल्या आहेत. तिच्या या व्हायरल फोटोवर नेटकरी चांगलेच घायाळ झालेले दिसत आहेत. या व्हायरल फोटोवर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडत दिशाच्या या मनमोहक सौंदर्याचे कौतुक केले आहे. याआधीही दिशाचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले होते ज्यावर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या होत्या. दरम्यान अभिनेत्री दिशाने एम.एस धोनी द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले होते. या चित्रपटातील तिच्या सहजसुंदर अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले होते. दिशाने आत्तापर्यंत मलंग, बाघी २, राधे, अशा गाजलेल्या चित्रपटात काम केले आहे.
- हेही वाचा –
- आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांचा ‘अश्विनी ये ना…’ गाण्यावरचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल
- आलियासोबत लग्न करणाऱ्या रणबीरने ‘या’ अभिनेत्रींना केले आहे डेट, एक आहे साऊथमधील सुपरस्टार अभिनेत्री
- ‘जर्सी’ सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कपिल शर्मा शोमध्ये दिसणार शाहिद आणि पंकज कपूर या बापलेकाची जोडी










