Friday, March 29, 2024

आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळी यांचा ‘अश्विनी ये ना…’ गाण्यावरचा डान्स व्हिडिओ झाला व्हायरल

आई कुठे काय करते? या मालिकेने खूपच कमी कालावधीत प्रेक्षकांच्या हृदयाचा ठाव घेतला. या मालिकेने टीआरपीमध्ये तर बाजी मारलीच शिवाय लोकप्रियतेत देखील कमालीची आघाडी घेतली आहे. सध्या ही मालिका पहिल्या क्रमांकावर विराजमान असून, मालिकेतील प्रत्येक भूमिकेने एक वेगळीच जागा सर्वांच्या मनात निर्माण केली आहे. याच मालिकेत नकारात्मक भूमिका साकारूनही अमाप प्रसिद्धी मिळवणारा अनिरुद्ध देशमुख अर्थात मिलिंद गवळी देखील प्रकाशझोतात आले आहे. त्यांच्या नकारात्मक भूमिकेलाही लोकांची चांगलीच पसंती मिळत आहे.

या मालिकेमुळे मिलिंद गवळी यांच्या करिअरमध्ये एक मोठे आणि सुखद वळण आले आहे. मिलिंद सोशल मीडियावरही चांगलेच सक्रिय झाले असून, ते नेहमीच विविध प्रकारचं पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे देखील मिलिंद यांना मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळताना दिसते. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट व्हायरल तर होतातच शिवाय नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय देखील बनतात.

मात्र यावेळेस मिलिंद गवळी यांचा एक व्हिडिओ चांगलाच गाजताना दिसत आहे. स्टार प्रवाह चॅनलच्या इंस्टग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या या व्हिडिओमध्ये मिलिंद गवळी चक्क डान्स करताना दिसत आहे. या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये मिलिंद गवळी हे अशोक सराफ यांच्या तुफान गाजलेल्या ‘अश्विनी ये ना…’ या गाण्यावर डान्सचा सराव करताना दिसत आहे. नुकतेच स्टार प्रवाहाचे पुरस्कार संपन्न झाले. या पुरस्कार सोहळ्यामध्ये मिलिंद गवळी यांनी देखील त्यांचा एक तडकता फडकता डान्स सादर केला. त्यांच्या या डान्सच्या सरावाचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ते त्यांच्या कोरिओग्राफरसोबत दिसत असून, गाण्यावर डान्स करत आहे.

आई कुठे काय करतेमध्ये अनिरुद्ध देशमुखची भूमिका मिलिंद गवळी साकारत असताना त्यांना प्रेक्षकांचा राग सहन करावा लागतो. मुख्य म्हणजे हेच त्याच्या भूमिकेचे आणि अभिनयाचे यश आहे. मिलिंद गवळी हे अभिनयाच्या क्षेत्रात गेली अनेक वर्ष कार्यरत असून, त्यांनी अनेक हिंदी, मराठी आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे. यासोबतच त्यांनी अनेक हिंदी आणि मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा