Sunday, December 22, 2024
[aioseo_breadcrumbs]

लाल बिकिनी घालून बीचवर ‘Chill’ करताना दिसली दिशा पटानी, बोल्ड फोटोला मिळतेय चाहत्यांची पसंती

बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी तिच्या बोल्ड लूकमुळे सोशल मीडियावर सतत चर्चेत असते. ती अनेकदा तिच्या आगामी चित्रपटांशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, तिचा एक फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती बीचवर चिल करताना दिसत आहे.

हा फोटो अभिनेत्रीने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेत्री लाल रंगाची टायगर प्रिंटेड बिकिनी परिधान करून मजा करताना दिसत आहे. या फोटोमध्ये ती बीचवर उभी राहून पोझ देत आहे. दिशाच्या या फोटोला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे, या फोटोला आतापर्यंत १६ लाखांहून अधिक युजर्सने लाईक केले आहे. तसेच कमेंट करून चाहते तिचे कौतुक करत आहेत. (disha patni seen enjoying beach in a red bikini fans said this after see picture)

अलीकडेच, एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिशाने सांगितले की, ती तिच्या आगामी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात अतिशय धाडसी आणि निर्भय व्यक्तिरेखा साकारत आहे आणि तिने शक्य तितके ऍक्शन स्टंट स्वतःच केले आहेत. यासाठी अभिनेत्री दमदार प्रशिक्षण घेत आहे.

दिशा पटानीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले, तर ती मोहित सूरी दिग्दर्शित ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता अर्जुन कपूर, जॉन अब्राहम आणि तारा सुतारिया देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. एकता कपूर निर्मित, हा चित्रपट २०११ मध्ये आलेल्या सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि श्रद्धा कपूर यांच्या चित्रपटाचा सिक्वेल आहे. याशिवाय ती शशांक खेतानच्या ‘योद्धा’ या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूरसोबत दिसणार आहे. यासोबतच दिशा एकता कपूरच्या ‘के टीना’ मध्येही दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘डॅड स्टॉप इट यार!’, एनसीबीच्या ऑफिसबाहेर वडिलांचे वागणे पाहून वैतागला आर्यन खानचा मित्र अरबाज मर्चंट

-Bigg Boss 15: रितेशच्या अगोदर एका डॉनसोबत होतं राखी सावंतचं अफेअर, स्वतः केला खुलासा

-‘फिट ऍंड फाईन’ दिसणारे अनिल कपूर ‘या’ आजाराने आहेत त्रस्त, व्हिडिओ शेअर करत स्वत: केला खुलासा

हे देखील वाचा