Saturday, April 19, 2025
Home टेलिव्हिजन TMKOC | अखेर शोला मिळाली नवी ‘दयाबेन’, आता ‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा

TMKOC | अखेर शोला मिळाली नवी ‘दयाबेन’, आता ‘ही’ अभिनेत्री घेणार दिशा वकानीची जागा

तारक मेहता का उल्टा चष्मा‘ (Taarak Mehta Ka Ooltaah Chashmah) या लोकप्रिय मालिकेतील दयाबेनला मिस करणाऱ्या चाहत्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आता दयाबेन लवकरच या शोमध्ये प्रेक्षकांना हसवताना दिसणार आहे. नुकतीच बातमी आली होती की, हे पात्र पुन्हा टीव्हीवर परतणार आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावर दिशा वकानीच्या (Disha Vakani) पुनरागमनाची अटकळही सुरू झाली होती. मात्र या शोच्या निर्मात्यांनी यावर कोणताही शिक्कामोर्तब केलेली नाही. पण आता माहिती समोर येत आहे की, प्रेक्षकांची मागणी पाहता लवकरच हे पात्र पुन्हा आणण्याची तयारी सुरू आहे.

‘या’ अभिनेत्रीचे नाव करण्यात आले फायनल
मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता दिशा वकानी नव्हे, तर दयाबेनच्या भूमिकेत एक नवीन चेहरा दिसणार आहे. सूत्रांनुसार, या व्यक्तिरेखेसाठी टीव्ही अभिनेत्री राखी विजनशी (Rakhi Vijan) चर्चा सुरू आहे. राखीने याआधी ‘हम पांच’ सारख्या लोकप्रिय टीव्ही मालिकेत प्रेक्षकांना हसवले आहे. वृत्तानुसार, राखी सध्या या व्यक्तिरेखेबाबत निर्मात्यांशी चर्चा करत आहे. जर सर्व काही ठीक झाले, तर राखी दीर्घ काळानंतर टीव्हीवर पुनरागमन करताना दिसणार आहे. (disha vakani will be replaced by this actress for dayaben character)

पात्रासाठी करतेय विशेष तयारी
रिपोर्ट्सनुसार, राखीने या शोची तयारीही सुरू केली आहे. सूत्रांच्या हवाल्याने असे समोर आले आहे की, राखीला हे पात्र वेगळ्या पद्धतीने साकारायचे आहे, तिने यासंदर्भात टीमशी अनेकवेळा संवादही साधले आहेत.

असे सांगितले जात आहे की, राखीला दिशा वकानीसारखे एक्सप्रेशन्स देता नाहीये. या आयकॉनिक व्यक्तिरेखेत फ्रेशनेस प्रेक्षकांना पाहायला मिळावी, अशी तिची इच्छा आहे. महत्त्वाचे म्हणजे, अलीकडेच तारक मेहताची भूमिका साकारणारे शैलेश लोढाही (Shailesh Lodha) हा शो सोडणार असल्याची चर्चा होती. याशिवाय मुनमुन दत्ता (Munmun Dutta) देखील लवकरच शोला अलविदा करणार असल्याच्या बातम्याही येत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा