Thursday, October 16, 2025
Home अन्य कास्टिंग काऊचला नकार दिल्याने दिव्यांका त्रिपाठीला मिळावी होती करिअर खराब करण्याचे धमकी

कास्टिंग काऊचला नकार दिल्याने दिव्यांका त्रिपाठीला मिळावी होती करिअर खराब करण्याचे धमकी

कास्टिंग काऊच हा शब्द मनोरंजन विश्वासाठी अजिबातच नवखा नाही. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये तर नेहमीच हा शब्द आणि याच्याशी संबंधित अनेक अनुभव कलाकारांकडून आपण ऐकले आहे. मात्र टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये ही गोष्ट नक्की घडतच असेल, मात्र ती तितकीशी पुढे येत नाही. पण टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्री असलेल्या दिव्यांका त्रिपाठीने (Divyanka Tripathi Dahiya) तिच्या कास्टिंग काऊचच्या अनुभवाबद्दल सांगत एकच खळबळ उडवली आहे. दिव्यांकाने तिच्या नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबद्दल खुलासा केला आहे.

दिव्यांकाने एका मोठ्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमध्ये या अनुभवांबद्दल सांगितले आहे. तिने सांगितले की, तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये काही लोकं सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने तिचा फायदा घेण्याचा प्रयत्न करायचे. पुढे दिव्यांका म्हणाली, “तुम्ही एक शो संपवता आणि लगेच तुमचा संघर्ष सुरु होतो. एक वेळ अशी होती जेव्हा माझ्याकडे अजिबात पैसे नव्हते. माझ्याकडे माझे बिल आणि ईएमआय आदी भरायला देखील पैसे नव्हते. माझ्यावर खूपच दबाव होता. तेव्हा माझ्याकडे एक ऑफर आली आणि मला सांगितले गेले की, जर तू या दिग्दर्शकासोबत राहिली तर तुला मोठा ब्रेक मिळेल. पण मीच का? तेव्हा मला सांगितले गेले की, मी खूप हुशार आहे. आणि अजून खूपच माझ्याबद्दल सर्व चांगले सांगितल्या गेले.”

दिव्यांका म्हणाली, “ही घटना #MeToo चळवळीच्या आधीची होती. जे लोकं आपल्याला अशा ऑफर देतात ते तुम्हाला अशा पद्धतीने समजावून सांगतात की, इंडस्ट्रीमध्ये सर्वच असे करत आहे. त्यांच्या बोलण्याला तुम्ही भुलतात आणि जाळ्यात अडकतात. जर तुम्ही असे केले नाही तर तुम्ही इंडस्ट्रीमध्ये मागे पडतात. हे लोकं तुमचे करिअर खराब करायला देखील मागेपुढे बघत नाही. मला हे सर्व हास्यास्पद वाटायचे. मला माझे पहिले काम माझ्या प्रतिभेमुळे मिळाले होते आणि दुसरे देखील त्याचमुळे मिळेल यावर माझा विश्वास होता.”

दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात ‘ऑल इंडिया रेडिओ’मध्ये सूत्रसंचालक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्यानंतर २००४ साली तिने ‘सिनेस्टार्स की खोज’मध्ये सहभाग घेतला. पुढे तिने दूरदर्शनवरील ‘आकाशवाणी’मधून अभिनयात पदार्पण केले. तिला खरी ओळख आणि प्रसिद्धी ‘बनूं मैं तेरी दुल्हन’ मातीतून मिळाली त्यानंतर तिने कधीच मागे वळून पाहिले नाही.

हेही वाचा :

हे देखील वाचा