Sunday, October 19, 2025
Home बॉलीवूड सोहा अली खानचे पती कुणाल आणि मुलीसोबत लक्ष्मीपूजन, गोड इनायाने वेधले सर्वांचे लक्ष

सोहा अली खानचे पती कुणाल आणि मुलीसोबत लक्ष्मीपूजन, गोड इनायाने वेधले सर्वांचे लक्ष

गेल्या वर्षी देशावर कोरोना विषाणूचे सावट असल्यामुळे २०२० वर्षातली दिवाळी कोणालाच जल्लोषात साजरी करता आली नव्हती. मात्र यंदा हा सण देशभरात मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यच नाही, तर बॉलिवूड विश्वात देखील मोठ्या धुमधडाक्यात दिवाळी साजरी होत आहे. कलाकार देखील हा सण त्यांच्या कुटुंबियांसोबत साजरा करत असून, ज्याची झलक ते चाहत्यांसोबत शेअर करत आहेत. बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री सोहा अली खान तिचा पती कुणाल खेमू आणि गोंडस मुलगी इनाया खेमूसोबत दिवाळीचा हा सुंदर सण साजरा करताना दिसली. तिने याचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सोहाने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर दिवाळी सेलिब्रेशनचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिचा पती कुणाल आणि मुलगी इनायासोबत पूजा करताना दिसत आहे. पहिल्या फोटोत सोहा, कुणाल आणि इनाया मंदिरासमोर डोके टेकवून बसलेले दिसतात. दुसरा फोटो सोहाचा असून, ज्यामध्ये ती खाली बसून पोज देत आहे. तर शेवटचा फोटो गोड इनायाचा आहे.

त्यांच्या लूकबद्दल बोलायचे झाले तर, सोहाने गुलाबी रंगाचा कुर्ता आणि स्टायलिश सलवार परिधान केली आहे, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. सोनेरी रंगाच्या शेरवानीमध्ये कुणाल नेहमीप्रमाणेच हँडसम दिसत असून, छोट्याशा इनायाने गुलाबी आणि पिवळ्या रंगाचा फ्रॉक घातला आहे.

या फोटोंसोबत सोहाने एक छान कॅप्शन देखील दिले आहे. ज्यामध्ये तिने सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, “दीपावलीच्या शुभेच्छा, तुमच्या घराच्या आणि हृदयाच्या प्रत्येक कोपरा प्रेमाने आणि प्रकाशाने उजळू द्या.” सोहाच्या या दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो चाहत्यांना खूप आवडत आहेत.

सोहाने तिच्या इंस्टास्टोरीवर अनेक फोटोसह आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. व्हिडिओमध्ये इनाया दिवाळीसाठी रांगोळी काढताना दिसत आहे. एका फोटोमध्ये सोहा तिची मोठी बहीण सबा अली खान आणि भाची सारा अली खानसोबत दिसत असून, तिघीही पारंपारिक पोशाखात अतिशय सुंदर दिसत आहेत.

 

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ मराठी अभिनेत्रींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या चाहत्यांना दीपावलीच्या शुभेच्छा

-पारंपारिक वेशभूषेत ‘या’ मराठमोळ्या लावण्यवतींनी दिल्या दिपावलीच्या शुभेच्छा! पाहा फोटो

-रितेश भैय्याचा अंदाजच लई भारी! बच्चे कंपनीसोबतचा व्हिडिओ शेअर करत दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा

हे देखील वाचा