Wednesday, June 26, 2024

व्हिडिओ: दिया मिर्झाने केला सावत्र मुलीचा वाढदिवस साजरा, वैभव रेखीच्या एक्स वाईफनेही लावली हजेरी

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दिया मिर्झा ही त्या अभिनेत्रींपैकी एक आहे, ज्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतात. तिने फेब्रुवारी महिन्यात व्यावसायिक वैभव रेखी याच्यासोबत लग्न केले आहे. लग्नानंतर काहीच दिवसात तिने खुलासा केला की, ती आई होणार आहे. दिया मिर्झाने तिची सावत्र मुलगी समायरा रेखीचा वाढदिवस साजरा केला. त्यामध्ये वैभव रेखीची एक्स पत्नी सुनैना रेखी देखील आली होती. यानिमित्त एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे.

सुनैना‌ रेखीने तिची मुलगी समायरा रेखीच्या वाढदिवसाचा व्हिडिओ तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिची मुलगी केक कापताना दिसत आहे, आणि दिया मिर्झा ही व्हिडिओ काढताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता की, दिया मिर्झाने पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला आहे. ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे.

हा व्हिडिओ शेअर करत सुनैनाने ‘परिवार,’ असे लिहिले. तिच्या या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती मिळत आहे. समायरा‌ आणि दिया मिर्झा यांच्यात खूप चांगली मैत्री आहे. त्यांचे बाॅडिंग देखील खूप चांगले आहे. त्या दोघीही आताच काही दिवसांपूर्वी वैभव रेखीसोबत मालदीवला गेल्या होत्या. तेथील फोटो देखील सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते.

वैभव रेखीची एक्स वाइफ सुनैना रेखी हिच्या सोबत दियाची देखील खूप चांगली मैत्री आहे. दियाने काही दिवसांपूर्वी तिच्या प्रेग्नेंसीबद्दल सोशल मीडियावर काही गोष्टी शेअर केल्या होत्या. त्यामुळे तिला खूप ट्रोल गेले होते. तिने त्या ट्रोलर्सला देखील चांगल्या खणखणीत शब्दात उत्तर दिले होते.

दिया मिर्झाने त्यांना उत्तर देताना लिहिले होते की, “मी प्रेग्नेंट आहे म्हणून आम्ही लग्न नाही केले. आम्ही आधीच लग्न केले आहे. कारण आम्हाला एकमेकांसोबत संपूर्ण आयुष्य घालवायचं आहे. जेव्हा आम्ही लग्न करायचा प्लॅन करत होतो, तेव्हा आम्हाला समजले की, आम्ही आई- बाबा होणार आहोत. त्यामुळे केवळ मी प्रेग्नेंट आहे म्हणून आम्ही लग्न नाही केले.”

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘दोन कोटी रुपये की, ६ मुलींसोबत हॉलिडे?’, प्रियांकाच्या प्रश्नावर कपिलने दिले जबरदस्त प्रत्युत्तर, ऐकून तुम्हीही खदखदून हसाल

-याला म्हणतात कहर! भोजपुरी स्टार अंकुश आणि शिल्पी यांच्या गाण्याचा राडा, दोन महिन्यातच मिळालेे १८ कोटींपेक्षा अधिक व्ह्यूज

-अनुपम खेर यांनी केला रस्त्यावर गाणाऱ्या मुलांचा सुंदर व्हिडिओ शेअर, म्हणाले ‘मला त्यांंना जग…’

हे देखील वाचा