Saturday, December 7, 2024
Home बॉलीवूड आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घरी एकटं सोडून बाहेर पडली दिया, म्हणाली, ‘हे खरंच…’

आपल्या पाच महिन्यांच्या बाळाला घरी एकटं सोडून बाहेर पडली दिया, म्हणाली, ‘हे खरंच…’

आईची व्याख्या एखाद्या वाक्यात करणे खरंच खूप कठीण आहे. प्रत्येक आई ही आपल्या तान्हुल्यासाठी खूप कष्ट घेत असते. आईच्या मनामध्ये सतत आपल्या बाळाविषयीच विचार सुरू असतो. काही न बोलता देखील आईला बाळाच्या मनामधले समजते. परंतु आजची आई ही फक्त चूल आणि मूल सांभाळणारी नाही. ती बाहेर जाते, पैसे कमवते आणि स्वतःच्या बाळाचा सांभाळ स्वतः करू शकते. अशा धावपळीच्या आणि स्पर्धेच्या जगात अनेक मातांना त्यांची मुलं घरी ठेवून कामासाठी बाहेर जावे लागते हे त्या सर्वच मातांसाठी खूप कठीण असते. अशात अभिनेत्री दिया मिर्झाने देखील तिच्या बाळाबरोबरचा एक अनुभव सर्वांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला आहे.

दियाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती तिच्या बाळाबरोबर दिसत आहे. तिने १४ मे रोजी तिच्या बाळाला जन्म दिला. सध्या तिचं बाळ पाच महिन्यांचं आहे. तिने बाळाबरोबरचा स्केच फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिचे बाळ म्हणजेच अव्यान आईच्या हृदयाजवळ झोपलेला आहे. फोटोमध्ये ती तिच्या बाळाला हृदयाशी धरून त्याच्यावर प्रेम करताना दिसत आहे. (Diya Mirza went to work leaving her five-month-old son at home, said – it was very difficult)

दियाने हा फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “फायनली गेल्या सायंकाळी एका स्पेशल शोचा भाग बनण्यासाठी घराबाहेर पडले होते. यावेळी मी या पूर्ण हुशार टीमचे आभार मानू इच्छिते ज्यांनी मला एवढा वेळ दिला. त्यांच्यामुळे मला फार छान वाटत आहे. परंतु हे सर्व माझ्यासाठी खूप म्हणजे खूप जास्त कठीण होते. मी ४ तासांसाठी माझ्या अव्यानपासून दूर होते. आई काम करणार अवी, कारण आईला या जगामध्ये एक सुरक्षित जागा बनवायची आहे. ज्यामध्ये तू मोठा होशील माझी जान.”

अभिनेत्रीने एका आईला तिच्या बाळाला घरी सोडून कामासाठी बाहेर जाताना कसे वाटते, याविषयी स्वतःचा अनुभव सांगितला आहे. तिने पोस्ट केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भरपूर हार्ट ईमोजींचा कमेंट्समध्ये समावेश केला आहे. दिया सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. दिया आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करते. तिने बाळाला जन्म दिल्यानंतर एक महिन्याने चाहत्यांना ही गोड बातमी सांगितली होती. तसेच काही दिवसांपूर्वीच तिने अव्यानची एक छोटीशी झलक चाहत्यांबरोबर शेअर केली होती.

तिने आपल्या अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. साल २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘संजू’ चित्रपटामध्ये देखील ती झळकली होती. या चित्रपटामध्ये तिच्या अभिनयाला प्रेक्षकांनी खूप प्रेम दिले होते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘आम्ही दोघांनी अजूनही लग्न नाही केले’, म्हणत सलमान खानने केला आयुष्यातील खऱ्या प्रेमाचा खुलासा

-TMKOC: एकेकाळी कर्जात पूर्णपणे बुडाला होता ‘सोढी’; मग कर्जदारांपासून वाचण्यासाठी केलं ‘हे’ काम

-लग्नानंतर प्रथमच बिकिनीमध्ये दिसली दिशा परमार; मालदीवमध्ये पती राहुलसह करतेय सुट्ट्या एन्जॉय

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा