सध्या छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात राहणाऱ्या सहदेव दिरडोने सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. सहदेवचा ‘बचपन का प्यार’ या गाण्याचा व्हिडिओ सोशल मीडिया खुप व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर एका रात्रीत तो स्टारही झाला आहे. अलिकडेच, सहदेवने बॉलिवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहसोबत ‘बचपन का प्यार’ हे गाणे रेकॉर्ड केले आहे.
त्याच्या या गाण्याचे सर्वजण कौतुक करत आहेत. अगदी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी प्रत्यक्षात सहदेवची भेट घेतली. तसेच त्यांनी त्याची आणि त्याच्या गाण्याची प्रशंसाही केली आहे.
सहदेवने २०१९मध्ये शाळेत असताना ‘बचपन का प्यार’ हे गाणे गायले होते. तुम्हाला माहित आहे का ‘बचपन का प्यार’ हे गाणे कुठून आले? हे गाणे २०१८मध्ये गुजरातमधील आदिवासी गायक कमलेश बरोटने गायले होते. हे गाणे मेशवा फिल्म्स यूट्यूब चॅनेलवर रिलीझ केले असून गाण्याला आतापर्यंत ८० लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
कमलेशचे हे एकमेव गाणे नाही. त्याने आतापर्यंत ६००० हून अधिक गाणी गायली आहेत. तो स्वतः यापैकी अनेक गाण्यांचा लेखक आणि संगीतकार आहे. हे गाणे लोकप्रिय झाल्यापासून, अनेक रॅपर्स आणि गायकांनी त्याच्या शब्दांचा वापर करून नवीन गाणी तयार केली आहेत. रॅपर बादशाहने एक व्हिडिओ बनवून इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे, त्यानंतर हे गाणे वाऱ्याप्रमाणे सर्वत्र पसरले. अभिनेत्री अनुष्का शर्मानेही सहदेवचे कौतुक केले आणि सांगितले की, हे गाणे दिवसभर त्याच्या मनात फिरत राहत आहे.
बादशाहच्या या नवीन गाण्यात सहदेवची मस्त आणि डॅशिंग स्टाईल पाहायला मिळत आहे. गाण्याच्या व्हिडिओमध्ये सहदेव रॉकस्टारप्रमाणे परफॉर्म करताना दिसत आहे. या गाण्यात सहदेवने त्याच्या व्हायरल ओळी देखील गायल्या आहेत, तर गाण्याचे बोल बादशाहने स्वतः लिहिले आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-व्हिडिओ: राज कुंद्राच्या अटकेनंतर शिल्पा शेट्टी पहिल्यांदाच दिसली सेटवर; चेहऱ्यावर होती उदासी
-‘बेलबॉटम’ रिलीझ होण्यापूर्वीच अक्षय कुमार पोहोचला लंडनमध्ये; ‘खिलाडी’ने घेतलीय मोठी रिस्क?