Monday, July 1, 2024

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून हॉटस्टार-डिझनीवर प्रदर्शित होणार ‘ही’ डॉक्युमेंटरी

जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. हा दिवस स्त्रीत्वाचा उत्सव म्हणून ओळखला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तुत्व आणि त्यांनी विविध क्षेत्रात गगन भरारी घेतली आहे. महिलांच्या हक्काचं रक्षण आणि स्त्री- पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे.

आधुनिक युगात महिलांनी भारतीय सशस्त्र सैन्यासह विविध क्षेत्रात प्रवेश केला आहे. त्यांनी त्यात आपली उत्कृष्ट कामगिरी देखील बजावली आहे. आज या महिला भारतीय सैन्यात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. अशाच महिलांचे सामर्थ्य आणि उत्सव साजरा करण्यासाठी नॅशनल जिओग्राफिक इंडिया चॅनेलने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. महिला दिन विशेष दिवसाचे औचित्य साधून येत्या ८ मार्चला ‘वुमन ऑफ ऑनर’ या सीरिजचे प्रसारण करणार आहे. ही सीरिज हॉटस्टार आणि डिझनीवर उपलब्ध होईल.

दिल्लीच्या एनसीसी सभागृहात प्रेस आणि सैन्याच्या अधिकाऱ्यांसमोर ही सीरिज प्रदर्शित करण्यात आली. ज्याला अनेकांनी पसंती दर्शविली आहे. भारतीय सैन्यात भरती झालेल्या महिलांचा प्रवास आणि त्यांच्या प्रवासामध्ये येणारी आव्हाने, शिस्त, संयम, अडथळे आणि क्षमता या सर्व गोष्टींवर आधारित असलेली या सीरिजची कथा आहे.

या प्रीमियरमध्ये प्रमुख पाहुण्यांच्या रुपात लेफ्टनंट माधुरी कानिटकर या हजर होत्या. भारतीय सशस्त्र दलात लेफ्टनंट जनरल या पदावर पोहोचणाऱ्या त्या तिसऱ्या महिला आणि पहिल्या बालरोगतज्ज्ञ आहेत.

या ४४ मिनिटांच्या सीरिजमध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधील दोन महिला कॅडेट्सच्या रंजक कथेचा समावेश करण्यात आला आहे. यात समाजातील रुढीवादी परंपरांना तोडण्यासाठी महिलांना कोणकोणत्या परिस्थितीतून जावे लागते, आणि यासर्वात त्या स्वत: ला कशा सक्षम बनवतात या सर्व गोष्टींचा उलगडा केला आहे.

चित्रपटाच्या प्रशिक्षणा दरम्यान या चित्रपटात काम करणारी श्रुती दुबे जी दुसरी महत्त्वाची महिला कॅडेड्स आहे, ती म्हणते की, “मी येथे येण्यापूर्वी कधीच विचार केला नव्हता की, एकावेळी अठ्ठावीस किलोमीटर इतकं धावू शकेन. आज मला स्वत:चा अभिमान वाटत आहे.”

सोबतच प्रमुख पाहुणे म्हणून आलेल्या माधुरी कानिटकर म्हणतात की, “ही सीरिज पाहून सर्वच मुले आणि मुली अधिक प्रोत्साहित होतील. दोघांसाठी ही सीरिज आहे. एकमेकांना साथ देणे, आधार देणे या सर्व गोष्टी मी सुरुवातीपासूनच अनुभवल्या आहेत. त्यामुळेच मी आजवर इथपर्यंत पोहोचली आहे. म्हणूनच मला सैन्यात यायची संधी मिळाली आहे.”

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘कट्यार काळजात घुसली’ चित्रपटात रोलसाठी विचारणा झाल्यावर शंकर महादेवन यांची अशी होती पहिली प्रतिक्रिया

-ऑन-स्क्रीन धमाल करणाऱ्या अभिनेत्रीचा बेंगलोरला जाताना झाला होता अपघात, अखेरची तेरा वर्ष काढली व्हिलचेअरवर

-तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी आहे श्रद्धा कपूरचं खास नातं

हे देखील वाचा