तुम्हाला माहितीये का? गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याशी आहे श्रद्धा कपूरचं खास नातं

shraddha kapoor birthday know about unknown facts of shraddha kapoor actress hot and bold instagram images aashiqui 2 shraddha kapoor relationship status sry


बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर आज तिचा 34 वा वाढदिवस साजरा करत आहे. श्रद्धा ही बॉलिवूडचे प्रसिद्ध खलनायक शक्ती कपूर यांची मुलगी आहे. श्रद्धा कपूरने तिच्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात ‘तीन पत्ती’ या चित्रपटाने केली होती. हा चित्रपट सपशेल फ्लॉप ठरला होता, परंतु श्रद्धाच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. पदार्पण अभिनेत्री म्हणून तिला फिल्मफेअर पुरस्कारासाठी नामांकितही करण्यात आले होते.

‘आशिकी 2’ चित्रपटाने दिली खरी ओळख
श्रद्धा ‘लव्ह का दि एंड’ चित्रपटात दिसली होती, पण ‘आशिकी 2’ या चित्रपटाने तिला चित्रपटसृष्टीत खरी ओळख दिली. तसेच या चित्रपटाचे सर्व बाजूंनी कौतुक झाले. यानंतर, तिच्या कारकिर्दीत सर्वकाही व्यवस्थित झाले. तिने ‘एक व्हिलन’, ‘हैदर’, ‘एबीसीडी 2’, ‘बाघी’, ‘अ फ्लाइंग जट’, ‘हाफ गर्लफ्रेंड’ आणि ‘स्त्री’ यांसारखे अनेक हिट चित्रपट केले.

लता मंगेशकरसोबत आहे श्रद्धाचे खास नाते
लता मंगेशकर यांचे श्रद्धा कपूरशी जवळचे नाते आहे. खरं तर श्रद्धा कपूरचे आजोबा म्हणजेच शक्ती कपूर यांचे वडील लता मंगेशकर यांचे चुलत भाऊ होते. यानुसार लता मंगेशकर ही श्रद्धा कपूरची आजी आहे. दोघांमध्ये भन्नाट बाँडिंग आहे. अभिनयाशिवाय श्रद्धाला गाण्याचीही खूप आवड आहे आणि ती अनेकवेळा तिच्या चित्रपटांमध्ये गाणे म्हणते. तिच्या ‘आजी’कडून तिला हा गुण मिळाला असल्याचे स्पष्ट होते. अभ्यासामध्ये चांगली कामगिरी करणार्‍या श्रद्धाच्या आईने मुलाखतीत सांगितले होते की, “ती अभिनेत्री नसती, तर तिला डॉक्टर बनण्यास आवडले असते.”

आगामी चित्रपटात असेल रणबीर कपूर आणि श्रद्धाची जोडी
लव्ह रंजन दिग्दर्शित बहुचर्चित असलेला चित्रपट होळीच्या निमित्ताने 18 मार्च 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर एकत्र पाहायला मिळणार आहेत. चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आली आहे. लव्ह फिल्म्सने त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर ही बातमी शेअर केली होती.

श्रद्धा अखेरच्या वेळेस वरुण धवनसोबत ‘स्ट्रीट डान्सर 3’ डी मध्ये दिसली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-यूएसमधील शिक्षण सोडून श्रद्धाने धरली मुंबईची वाट, पहिलाच चित्रपट ठरला होता सुपरफ्लॉप, वाचा अभिनेत्रीचा अभिनयप्रवास

-कधी काय ट्रेंड होईल याचा नेम नाही! अभिनेत्री अभिज्ञानंतर आता मितालीचे ‘मंगळसूत्र’ ठरतंय चर्चेचा विषय

-आपल्या मनमोहक अदांनी ‘या’ अभिनेत्रीने पाडली होती प्रेक्षकांना भुरळ, ओडिशात शुटिंग दरम्यान झाला होता बलात्काराचा प्रयत्न


Leave A Reply

Your email address will not be published.