Saturday, July 6, 2024

‘क्या होगा निम्मो का’मधील ‘प्रीत सहगल’ झाली ७८ वर्षांची; लग्न न करताही आहे एका मुलाची आई

‘क्या होगा निम्मो का’ चित्रपट म्हणले की, प्रीत सेहगलची भूमिका लगेच डोळ्यासमोर येते. ही भूमिका साकारणाऱ्या डॉली ठाकूरच्या अभिनयाचे त्यावेळी प्रचंड कौतुक झाले होते. डॉली ठाकूर यांच्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर चांगलीच भुरळ घातली होती. त्याचबरोबर त्यांच्या ‘गांधी’ या चित्रपटातील अभिनयाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले होते. गुरुवारी (१० मार्च) डॉली ठाकूर यांचा वाढदिवस साजरा केला, जाणून घेऊया त्यांच्याबद्दल.

डॉली ठाकूर (Dolly Thakore) या हिंदी चित्रपट जगतातील एक हरहुन्नरी कलाकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जन्म १० मार्च, १९४३ ला झाला होता. डॉली ठाकूर यांच्या अभिनयाची सुरूवात साध्या नाटकांपासून सुरू झाली होती.  त्यांनी १९८२ मध्ये आलेल्या ‘गांधी’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांनी या चित्रपटात कास्टिंग डायरेक्टर आणि युनिट प्रचारक अशा भूमिका साकारल्या होत्या. डॉली ठाकूर या लंडनमधून शिक्षण घेऊन भारतात रेडिओ किंवा टीव्हीवर समालोचन करण्यासाठी आल्या होत्या. त्यांनी बातम्या समालोचक म्हणून मुंंबई दूरदर्शनवर कामही केले होते. त्यांचा हा कार्यक्रम रात्री ८ वाजता प्रसारित केला जायचा. यामुळेच त्यांना चांगली प्रसिद्धी मिळाली होती.

डॉली ठाकूर यांनी चित्रपट आणि अभिनयासोबतच अनेक क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याचा दमदार ठसा उमटवला आहे. त्यांनी आपल्या आयुष्यातील अनेक वर्ष अशा कार्यक्रमात आणि रंगमंचावर घालवलेली  आहेत. डॉली ठाकूर यांनी टेनेसी विलियम्स यांच्या स्ट्रीटकार ‘नेम्ड डिझायन’,आर्थर मिलनचे ‘ऑल माई सन्स’, ‘द बर्थडे पार्टी’सारख्या अनेक गाजलेल्या नाटकांमध्ये काम केले आहे. त्या २००३ मध्ये आलेल्या ‘पेज ३’ आणि ‘व्हाईज इज’ मध्येही झळकल्या होत्या.

आपल्या अभिनयासोबतच डॉली ठाकूर यांचे खासगी आयुष्यही चांंगलेच चर्चेत राहिले होते. त्या संपूर्ण आयुष्यभर अविवाहित राहिल्या. मात्र, त्यांच्या नाटकातील सहकलाकार असलेल्या एलिक पदमसी यांच्याकडून त्यांना एक मुलगा झाला. ज्याचे नाव क्वासर पदमसी असे ठेवले होते. सध्या तो सुद्धा मुंबईमध्ये अभिनेता, दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. सध्या डॉली ठाकूर अनेक नाटकांमध्ये, आणि वृत्तपत्रांमध्ये समीक्षक म्हणून काम करताना दिसतात. त्यांच्या जीवनावर डॉली ठाकूर नावाचे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे, जे चर्चेत आले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही  वाचा-

हे देखील वाचा