मराठमोळा अभिनेता अनिकेत विश्वासराववर हिंसाचारासह मारहाणीचा गुन्हा दाखल, पत्नीने केले गंभीर आरोप


समाजात आजही असे लोक आहेत ज्यांना स्त्री आपल्या व्यावसायिक जीवनात पुढे जाताना बघवत नाही. मग ती स्त्री आपली स्वतःची पत्नी असली तरीही. आपली पत्नी आपल्यापेक्षा वरचढ ठरेल याची भीती अनेकांमध्ये असते. त्यामुळेच आपल्यापेक्षा पुढे जाऊ नये यासाठी कित्येक पुरूष स्त्रियांचा छळ करतात. अशीच एक धक्कादायक घटना मराठी चित्रपटसृष्टीतून समोर आली आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता अनिकेत विश्वासराव याच्यासह त्याचे आई-वडिल या तिघांविरोधात त्याची पत्नी आणि अभिनेत्री स्नेहा चव्हाणने तक्रार दाखल केली आहे. अनिकेत विश्वासराव तिला सातत्याने मारहाण करत असल्याने तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.

https://www.instagram.com/p/CNPhLBmn853/?utm_source=ig_web_copy_link

पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीनुसार, पती अनिकेत विश्वासरावने १० डिसेंबर २०१८ ते २ फेब्रुवारी २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत चित्रपट सृष्टीमध्ये आपल्यापेक्षा पत्नीचे नाव मोठे होईल, या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिली आणि गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केला. यामध्ये सासू-सासऱ्यांनीही त्याची साथ दिली, अशी तक्रार स्नेहा चव्हाणने पोलिसांकडे केली आहे.

https://www.instagram.com/p/CIPlq7FHNC0/?utm_source=ig_web_copy_link

स्नेहाच्या या तक्रारीनंतर पोलिसांनी पती अनिकेत विश्वासराव सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव यांच्याविरुद्ध अलंकार पोलिस ठाण्यात कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्यापही यातील कोणालाच अटक झाली नाही. पण त्यांना लवकरच अटक होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात सतत वाद होत सुरू होते. अशी माहिती पोलिसांनी दिली असून, या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

अनिकेत विश्वासराव आणि स्नेहाने ५ ऑगस्ट २०१८ रोजी लग्नगाठ बांधली. अनिकेत विश्वासराव हा मराठी मालिका आणि चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध चेहरा आहे. तर स्नेहाने २०१६ मध्ये स्वप्निल जोशीच्या ‘लाल इश्क’ या चित्रपटातून पदार्पण केले होते. अनिकेत आणि स्नेहाने ‘हृदयात समथिंग समथिंग’मध्ये एकत्र काम केले होते.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-Bigg Boss 15: राकेश बापट गेल्यानंतर शमिता शेट्टीलाही काढावं लागलं बाहेर, पण का?

-ओढणीआड लपलेल्या नोरा फतेहीचा देसी लूक पाहून चाहते झाले वेडे, नेटकरी म्हणाले, ‘हाय गर्मी’

-ठरलं तर! अंकिता लोखंडेने व्यक्त केली लग्नाविषयीची भावना, ‘या’ तारखेला घेणार सात फेरे


Latest Post

error: Content is protected !!