Tuesday, April 23, 2024

‘या’ दिवसापासून सुरू होणार ‘डॉन 3’चे शूटिंग, फरहान अख्तर आणि रणवीर सिंगच्या चित्रपटाचे मोठे अपडेट समोर

चित्रपट निर्माता आणि अभिनेता फरहान अख्तरने रणवीर सिंग बहुप्रतिक्षित चित्रपट ‘डॉन 3’ मध्ये मुख्य भूमिका साकारणार असल्याची घोषणा केल्यापासून, चाहते चित्रपटाशी संबंधित अगदी लहान अपडेट्सची वाट पाहत आहेत. डॉन फ्रेंचायझीच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानची जागा घेत डॉनची भूमिका साकारणार आहे. आता चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित एक मोठे अपडेट समोर आले आहे.असे म्हटले जात आहे की चित्रपटाचे निर्माते याचे शूटिंग सुरू करण्यास उत्सुक आहेत आणि त्यांनी चित्रपटाचे शूटिंग कधी सुरू करायचे हे ठरवले आहे.

माध्यमातील वृत्तानुसार, चित्रपटाचे शूटिंग शेड्यूल ट्रॅकवर आहे आणि ते पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये फ्लोरवर जाईल. प्री-प्रॉडक्शनचे काम सुरू झाले आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होणार आहे. असा दावा करण्यात आला की डॉन 3 2025 मध्ये सुरु होण्याची शक्यता आहे. त्यानुसार शूटिंगची तयारी करण्यात आली आहे. फरहानने मागील मुलाखतींमध्ये माहिती दिली होती की त्याला चित्रपटाची लवकर घोषणा करायची आहे.

अलीकडेच रणवीर सिंग एका वर्षासाठी अभिनयातून ब्रेक घेत असल्याची बातमी आली होती. रणवीरने एक वर्षाची रजा घेतल्याच्या बातमीने ‘डॉन 3’च्या शूटिंगबाबत सगळ्यांना प्रश्न पडला होता. अशातचफरहान अख्तरने खुलासा केला होता की तो अभिनेता म्हणून त्याच्या पुढच्या चित्रपटाचे शूटिंग जुलैमध्ये सुरू करणार आहे. अशा परिस्थितीत आता चाहत्यांना ‘डॉन 3’ ची चिंता लागली आहे.

‘डॉन 3’ बद्दल बोलताना फरहानने याआधी प्रेक्षकांना एक खास भेट दिली होती. या चित्रपटात मुख्य अभिनेत्री म्हणून कियारा अडवाणीची निवड करण्यात आली आहे. टीमने घोषणा व्हिडिओ शेअर केला आणि खुलासा केला की कियारा अडवाणी आता डॉन विश्वाचा एक भाग बनली आहे, ज्यावर अभिनेत्रीनेही चित्रपटात काम करण्यासाठी कृतज्ञता आणि उत्साह व्यक्त केला. कियारा म्हणाली की, “डॉन फ्रँचायझीचा भाग बनून आणि या अतुलनीय संघासोबत काम करण्यास मी रोमांचित आहे. आम्ही एकत्र या रोमांचक प्रवासाला सुरुवात करत असताना आम्ही तुमच्या सर्व प्रेमाची आणि समर्थनाची अपेक्षा करते.”

फरहान अख्तर दिग्दर्शित ‘डॉन 3’ पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. मूळ चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी डॉनची भूमिका साकारली होती. एक्सेल प्रॉडक्शन फ्रँचायझीच्या शेवटच्या दोन चित्रपटांमध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता. एकीकडे फरहानने यावेळी रणवीरवर डॉन होण्याचा विश्वास व्यक्त केला आहे, तर दुसरीकडे ही भूमिका जबाबदारीने साकारण्यासाठी रणवीरही उत्सुक आहे. त्याचबरोबर शाहरुख खानला डॉनच्या भूमिकेत पाहण्याची इच्छा असलेला एक वर्ग नाराजी व्यक्त करत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

कार्तिकच्या करिअरमध्ये आणखी एक मेगा बजेट चित्रपट, साजिद नाडियाडवाला-विशाल भारद्वाजसोबत करणार ॲक्शन
‘निवडणुकीची वेळ आहे, मला श्वास घ्यायलाही भीती वाटते’, रजनीकांत यांचे वक्तव्य चर्चेत

हे देखील वाचा