मुंबईचा ‘डॅडी’ बनणार आजोबा! मुलीच्या डोहाळे जेवणाचा व्हिडिओ व्हायरल

don arun gawali is going to be grandfather actor akshay waghmare shared good news


मुंबईचा ‘डॅडी’ म्हणजेच कुख्यात गुंड अरुण गवळी हे नाव आपण ऐकूनच असाल. अनेकवेळा विविध कारणांनी चर्चेत राहणारा अरुण गवळी आता पुन्हा चर्चेत आला आहे. मात्र, यावेळी चर्चेचे कारण वेगळे आहे. वृत्तानुसार, ‘डॅडी’ आता आजोबा होणार असल्याचे समोर आले आहे. अरुण गवळीची मुलगी आई होणार आहे. त्याच्या जावयाने, म्हणजेच अभिनेता अक्षय वाघमारेने इंस्टाग्रामवरून ही गोड बातमी शेअर केली आहे.

अरुण गवळीची मुलगी योगिता गवळी- वाघमारे हिच्या डोहाळे जेवणाचा सोहळा नुकताच पार पडला आहे. या सोहळ्यातील एक व्हिडिओ शेअर करून अक्षयने चाहत्यांना ही बातमी दिली. “पाहुणा घरी येणार गं”, असे कॅप्शन त्याने व्हिडिओला दिले आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

या व्हिडिओमध्ये योगिता गवळीने लाल रंगाची साडी परिधान केली होती. व्हिडिओवर कमेंट करून चाहत्यांनी या दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

मागच्या वर्षी 8 मे ला अक्षय आणि योगिता लग्नबंधनात अडकले होते. त्यांच्या प्रेमकथेची सुरुवात मैत्रीपासून झाली आणि ही मैत्री हळूहळू प्रेमात रूपांतरित झाली. 5 वर्ष एकमेकांसोबत राहून अखेर त्यांनी 8 मे 2020 रोजी लग्न केले. त्यांचे लग्न मुंबईतील भायखळा परिसरातील दगडी चाळीतच झाले. हे लग्न लॉकडाउन दरम्यान झाले असल्याने, लग्नाच्या वेळी फक्त गवळी- वाघमारे कुटुंबीय उपस्थित होते.

अक्षय वाघमारेने बऱ्याच मराठी चित्रपटात महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘बेधडक’, ‘फत्तेशिकस्त’, ‘दोस्तीगिरी’, ‘बस स्टॉप’ इत्यादी चित्रपटांमध्ये तो दिसला आहे. ‘ती फुलराणी’ मधील त्याची भूमिका विशेष गाजली, तर योगिता महिलांच्या आरोग्यासाठी काम करणाऱ्या एका सामाजिक संस्थेसाठी काम करते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-‘मिर्झापूर’ वेबसीरिजनंतर श्रिया पिळगावकर ‘या’ दाक्षिणात्य चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला, साकारणार पत्रकाराची भूमिका


Leave A Reply

Your email address will not be published.