परी म्हणू की सुंदरा..! पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये मराठमोळी अभिनेत्री दिसतेय जणू स्वर्गातील अप्सरा


सेलिब्रिटी मंडळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे नेहमी चर्चेत असतात. आजकाल चित्रपटसृष्टीतील जवळपास सर्व कलाकार सोशल मीडियावर सक्रिय असतात. मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री देखील यात मागे नाहीत. सोशल मीडियावर आपल्या मनमोहक अदांचा जलवा दाखवणाऱ्या अभिनेत्रीपैकी एक म्हणजे ‘पल्लवी पाटील.’ जितकी ती पारंपरिक अंदाजात आकर्षक दिसते, तिचा हॉट अंदाजपण रसिकांना तितकाच घायाळ करतो. प्रत्येक फोटोतील मादक अंदाजाने कोणाचीही विकेट पडेल अशी तिची अदा आहे.

पल्लवी पाटील सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. ती आपल्या लूक स्टाईल आणि फॅशनबाबत नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती स्वत:चे निरनिराळे फोटो आपल्या फॅन्ससोबत शेअर करत असते. तिचे फोटोमधील सौंदर्य कुणालाही घायाळ करेल असेच आहे. केवळ साडीत नव्हे, तर तिने परिधान केलेल्या प्रत्येक कपड्यात ती फारच आकर्षक दिसत असते.

नुकताच तिचा एक नवीन फोटो आणि छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. यात ती खूपच सुंदर दिसत आहे. ज्यात तिने पांढऱ्या रंगाचे आऊटफिट घातले आहे. स्वर्गातून धरतीवर उतरलेल्या अप्सरेसारख्या तिच्या या फोटोने भल्याभल्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. तिने त्या फोटोत शायरीचा उल्लेख केला आहे. जो खूपच भारावून सोडणारा आहे. सोबतच तिने जो लहान व्हिडिओ शेयर केला आहे, त्या व्हिडिओवर अभिनेत्री प्रार्थना बेहरे सुद्धा कमेंट करायला विसरली नाही. चाहत्यांना तिचा हा ग्लॅमरस लूक कमालीचा पसंतीस पडला आहे. ती आपल्या लूकमध्ये बिंधास्त मूडमध्ये दिसते.

पल्लवीचा जन्म धुळे येथे झाला असून तिचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील आहे. पल्लवी पाटील हिने तिचे शालेय शिक्षण सर्वोदय माध्यमिक विद्यालय येथून केले आहे. तर उच्च माध्यमिक शिक्षण प्रताप कॉलेज, अमळनेर येथून केले. पल्लवीने डी. वाय. पाटील महाविद्यालयातून आर्किटेक्ट ही पदवी मिळवली. क्लासमेट या चित्रपटातून तिने या क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटाच्या यशाने पल्लवीला मराठी चित्रपटसृष्टीत नवी ओळख मिळवून दिली.

सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर तिचे फॉलोर्वस आहे. ‘शेंटीमेंटल’, ‘सविता दामोदर परांजपे’, ‘बॉइज-२’, ‘तू तिथे असावे’ अशा सिनेमात पल्लवी पाटीलने खूपच चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. ‘गोंद्या आला रे’च्या माध्यमातून तिने वेबसीरिजच्या दुनियेतदेखील पदार्पण केले आहे. ती अंकुश चौधरीच्या ‘ट्रिपल सीट’ या चित्रपटात दिसली आहे. आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती देखील पल्लवी सोशल मीडियावर देत असते.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा

-शर्टलेस सलमान खानसोबतचा फोटो शेअर करून अर्पिता खानने दिला जुन्या आठवणींना उजाळा

-बंदूक घेऊन सपना चौधरी बनली ‘गुंडी’, गाण्याचा टिझर रिलीझ

-हरियाणवी ‘डान्सिंग क्वीन’ सपना चौधरी ‘नकटो’ गाण्यातून प्रेक्षकांच्या भेटीला! काही तासांतच व्हिडिओला मिळाले लाखो व्ह्यूज


Leave A Reply

Your email address will not be published.