अभिनेता अंशुमन विचारे त्याच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखला जातो. मात्र या दिवसात त्याच्यापेक्षा त्याची चिमुकलीच अधिक चर्चेत असते. अंशुमनची मुलगी अन्वी हिचे व्हिडिओ बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. चाहत्यांनाही तिचे व्हिडिओ खूप आवडतात. आता अन्वीचा असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
या व्हिडिओमध्ये अंशुमनची लेक अन्वी त्याच्यावर दमदाटी करताना दिसत आहे. या दमदाटी मागचे कारणही तितकेच रंजक आहे. वास्तविक आपल्या वडिलांनी इतर कोणत्याही अभिनेत्रीसोबत डान्स करू नये अशी तिची इच्छा आहे. अंशुमनला एका अभिनेत्रीसोबत डान्स करताना पाहून अन्वी आपल्या वडिलांवर चिडलेली दिसत आहे.
या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अन्वी तिच्या आईला म्हणतेय, ज्या अभिनेत्रीसोबत बाबांनी डान्स केला आहे तिला व्हिडिओ कॉल लाव. यावर तिची आई हसत हसत तिला सांगते की, माझ्याकडे तिचा नंबर नाहीये. नंबर नसेल तर मग आपण तिच्या घरी जाऊयात असा हट्ट अन्वीने धरलेला पाहायला मिळत आहे.
एवढेच नव्हे, तर अन्वीने त्या अभिनेत्रीला देखील चांगलीच धमकी दिली आहे. ती म्हणतेय की, पुन्हा जर माझ्या बाबांसोबत डान्स केलास तर तुला धुवुन टाकेन. हा व्हिडिओ शेअर करत अंशुमनने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “माझं काही खरं नाही, कुठल्याच हिरोईन सोबत डान्स करायचा नाही असं अन्वीने बजावलंय…फुल्ल राडे.” अन्वीचा हा मजेदार व्हिडिओ आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘पावसाळ्या संध्याकाळी होणारे काही मूड…’, म्हणत भजी खाण्यापूर्वी शेतात फिरताना दिसतोय सुव्रत जोशी
-जेव्हा कृष्णा अभिषेकने घेतले होते अनिल कपूरचे रूप; पाहून लोटपोट झाली होती सोनम कपूर
-‘तूच माझ्या जगण्याचा आधार’, सपना चौधरीच्या सुंदर व्हिडिओवर चाहत्याची प्रेमळ कमेंट