Tuesday, November 18, 2025
Home कॅलेंडर आंबेडकर जयंती स्पेशल: आजपर्यंत महामानवाच्या आयुष्यावर आलेले ‘हे’ दर्जेदार चित्रपट म्हणजे त्यांना मानवंदनाच

आंबेडकर जयंती स्पेशल: आजपर्यंत महामानवाच्या आयुष्यावर आलेले ‘हे’ दर्जेदार चित्रपट म्हणजे त्यांना मानवंदनाच

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व, विश्वरत्न, महानायक, क्रांतीसुर्य, भारतरत्न,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती देशभरात आज मोठ्या उत्साहाने साजरी होत आहे. समाजातील तळागाळातल्या लोकांना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांनी अखंड लढा दिला. स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन मुल्यांची शिकवण त्यांनी जगाला दिली. जगातील सर्वात विद्वान व्यक्ती म्हणून त्यांनी जगभरात प्रसिद्धी मिळवली म्हणूनच या महानायकाच्या व्यक्तिमत्वाला जगभरातून मानवंदना दिली जाते. चित्रपट जगतातही बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अनेक चित्रपट तयार करण्यात येत आले आहेत. गुरूवार( १४ एप्रिल) डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त पाहूया त्यांच्या जीवनावर आधारित असलेले चित्रपट.

बाबासाहेब आंबेडकर –
‘बाबासाहेब आंबेडकर’ हा चित्रपट २००० साली जब्बार पटेल यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात साऊथ अभिनेता मामूट्टी दिसला होता . हा चित्रपट हिंदी आणि इंग्रजी भाषेतही प्रदर्शित झाला होता. चित्रपटाला इंग्रजी श्रेणीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला होता. याशिवाय मामूट्टी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि जब्बार पटेल यांना सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शनाचा पुरस्कारही मिळाला होता. चित्रपटाला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद मिळाला होता.

डॉ.बी.आर.आंबेडकर –
‘डॉ. शरण कुमार कब्बूर दिग्दर्शित बीआर आंबेडकर’ २००५ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट कन्नड भाषेत थिएटरमध्ये आला होता. यात आंबेडकरांची भूमिका विष्णुकांत बी.जे. तसेच अभिनेत्री तारा त्यांची पहिली पत्नी रमाबाई आंबेडकर म्हणून दिसली. त्याचवेळी भव्या त्यांच्या दुसऱ्या पत्नी सविता आंबेकरच्या भूमिकेत दिसली होती. हा चित्रपटही चांगलाच लोकप्रिय ठरला होता.

रमाबाई भीमराव आंबेडकर –
प्रकाश जाधव यांनी दिग्दर्शित केलेला ‘रमाबाई भीमराव आंबेडकर’ हा चित्रपट २०११ साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट मराठी भाषेत प्रदर्शित झाला, चित्रपटात गणेश जेठे, नंदकुमार नेवाळकर, निशा परुळेकर, प्रभाकर मोर, अनिल सूत्रे, अमेय पोटकर, निमेश चौधरी, प्रथमेश प्रदीप, दशरथ हातिसकर, स्नेहल वेलणकर हे कलाकार एकत्र दिसले होते. बायोपिक प्रेमींसाठी हा एक उत्तम चित्रपट आहे.

भीम गर्जना –
‘भीम गर्जना’ हा सुधाकर वाघमारे दिग्दर्शित मराठी चित्रपट आहे, जो १९८९  साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपटही त्यांच्या आयुष्यावर चित्रीत करण्यात आला होता. ज्यामध्ये कृष्णानंद आणि प्रतिमादेवी सारख्या कलाकारांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.

बाळ भीमराव –
२०१८ साली ‘बाळ भीमराव’ हा मराठी भाषेत प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश नारायण जाधव यांनी केले होते. मोहन जोशी, विक्रम गोखले, किशोरी शहाणे विज, प्रेमा किरण असे दिग्गज मराठी कलाकार या चित्रपटात एकत्र दिसले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा