Thursday, March 28, 2024

सोनमच्या सासू- सासऱ्यांच्या घरी चोरी | ‘या’ जवळच्या व्यक्तीलाच ठोकण्यात आल्या बेड्या

काही दिवसांपूर्वी बातमी समोर आली होती की, सोनम कपूरच्या (Sonam Kapoor) घरात चोरी झाली आहे. मात्र ही चोरी तिच्या सासू सासऱ्यांच्या घरी झाली होती. अशातच आता या प्रकरणी पोलिसांनी एका जोडप्याला अटक केली आहे. नरेश आणि अपर्णा अशी आरोपींची नावे असून, ते पती-पत्नी आहेत. अपर्णा नर्स म्हणून काम करते. सोनम कपूरच्या प्रिया आहुजा यांच्या घरी तिचं नेहमी येणं जाणं चालूच होतं. तिने हळूहळू दागिने आणि नंतर रोख रक्कम मिळून २.४७ कोटी रुपयांची चोरी केली. सोनमच्या सासूचे घर नवी दिल्ली जिल्ह्यातील अमृता शेरगिल मार्गावर आहे.

आरोपी महिला सोनम कपूरच्या सासूच्या घरी गरज पडेल तेव्हा रुग्णाची काळजी घेत असे. ती नेहमी जात नसली, तरी गरज पडेल तेव्हा तिला बोलावले जायचे. यामुळेच ती सोनमच्या सासू-सासऱ्यांच्या खूप जवळची झाली होती. आता अपर्णा आणि तिचा पती या दोघांना चोरीप्रकरणी अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी करण्यात येत आहे. (delhi crime husband and wife arrested for theft of crores at sonam kapoor mother in law house)

हेही वाचा: धक्कादायक! सोनम कपूरच्या घरावर पडला मोठा दरोडा, कोटींचे दागिने आणि रक्कम लंपास

२.४ कोटींची चोरी
२३ फेब्रुवारी रोजी सोनम कपूरची सासू सरला आहुजा यांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती, ज्यामध्ये घरातून २.४ कोटी रुपये चोरीला गेल्याचे सांगण्यात आले होते. यामध्ये दागिने आणि रोख रकमेचा समावेश आहे. त्यांना ११ फेब्रुवारी रोजी चोरी झाल्याचे समजले होते. या प्रकरणी पोलिसांनी २३ फेब्रुवारी रोजी तुघलक रोड पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदवला होता. प्रकरणाचे गांभीर्य पाहता स्थानिक पोलिसांसह विशेष कर्मचाऱ्यांचे पथकही तपासात सहभागी झाले होते. मात्र, आता पोलिसांनी आरोपींचा शोध घेतल्याचा दावा केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा