अभिनेत्री राखी सावंत कोणत्या ना कोणत्या कारणाने सतत चर्चेत असते. अशातच आता राखी पती आदिल दुर्रानीसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. नुकतेच राखीने पती आदिलवर एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरचे आरोप केले होते, त्यासाेबतच आता तिने त्याच्यावर पैसे आणि दागिने चोरीसह अत्याचार केल्याचा आरोप केला आहे.
सोमवारी (दि. 6 फेब्रुवारी)ला अभिनेत्रीने आदिलविरुद्ध मुंबईच्या ओशिवरा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. अशा परिस्थितीत आता पोलिसांनी आदिलला अटक केली आहे. त्याचवेळी नुकतेच राखीचा एक्स पती रितेशचे वक्तव्य समोर आले आहे. तीन वर्षांत राखी सावंतने आपल्यावर खूप प्रेम केल्याचे त्याने म्हटले आहे.
राखी सावंतचा एक्स पती रितेश नुकताच इंस्टाग्रामवर लाइव्ह आला आणि म्हणाला, “राखी खूप छान मुलगी आहे. राखीच्या बोलण्यात तथ्य आहे. राखी आज आदिलबद्दल जे काही बोलत आहे, ते तिनं मला तीन महिन्यांपूर्वी सांगितलं होतं. राखी मी तुझ्यासोबत आहे आणि सदैव असेन. आज तू ज्या वेदनेत आहेस त्या वेदना मलाही एकेकाळी होत्या. माझ्या आई-वडिलांनंतर माझ्यावर जर कोणी जास्त प्रेम केले असेल तर ती फक्त राखीच होती.”
View this post on Instagram
रितेशने पुढे सांगितले की, “ज्या दिवशी राखीची आई वारली, त्या दिवशी त्या माझ्या स्वप्नात आल्या आणि म्हणाल्या तू राखीला कायम सपाेर्ट कर. म्हणूनच राखी मी सदैव तुझ्यासाेबत आहे. राखी मी तुझ्यासोबत काही चूक केली नाही. मी तुझ्या आईवर दोन वर्षे उपचार केले. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. जिथे तुला माझी गरज आहे तिथे मी आहे.” रितेश पुढे म्हणाला की, “राखीच्या जीवाला धोका आहे. राखीला काहीही झाले तरी माझ्यापेक्षा वाईट कोणी राहणार नाही. राखी, काळजी घे.”
View this post on Instagram
त्याचवेळी राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, आदिल काल रात्री तिला मारण्यासाठी तिच्या घरी आला होता. यानंतर राखीने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.(dramaqueen rakhi ex husband ritesh statement surfaced after adil durrani arrest)
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
रितेश-जिनेलियाच्या लग्नाला 11 वर्ष पूर्ण, आठवणींना उजाळा देत शेअर केला लग्नाचा व्हिडिओ
कियारा-सिद्धार्थचा शाही विवाहसोहळा संपन्न, साताजन्माच्या बंधनात अडकलं बॉलिवूडचं लोकप्रिय कपल