Thursday, April 18, 2024

राखी सावंत झेड सुरक्षेसाठी पंतप्रधान मोदींना भेटणार; म्हणाली, ‘कंगनाला भेटली मग मला…’

कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. यापूर्वी राखी आदिल खानसोबतच्या तिच्या विस्कळीत नात्यामुळे चर्चेत आली होती. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे ईमेल आल्याने तिचे नाव चर्चेत राहिले. अशात आता राखी अशा कारणामुळे चर्चेत आली आहे, ज्याची कल्पना क्वचितच कोणी केली असेल.

राखी सावंत (rakhi sawant) हिने काही दिवसांपूर्वीच दावा केला होता की, तिला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचा ईमेल आला होता. सलमान खानला आम्ही बॉम्बेमध्ये मारून टाकू, त्यात इन्वॉल्व हाेवू नका, अन्यथा तुम्हाला अडचणीत येणार, असे मेलमध्ये म्हटले होते.

हा मेल पाठवण्यात आला कारण, सलमान खानला लॉरेन्स बिश्नोईकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती, ज्यामध्ये राखीने हस्तक्षेप करत लॉरेन्स बिश्नोईला असे न करण्याचे आवाहन केले होते. त्याचवेळी या मेलनंतर राखी इथेच थांबली नाही, तर तिने आता स्वत:साठी झेड सुरक्षा मागितली आहे.

काल रात्री मुंबईत एक कार्यक्रम झाला, ज्यामध्ये टेलिव्हिजन जगतातील तमाम स्टार्स पोहोचले. याच कार्यक्रमात राखी सावंतही सहभागी झाली होती. अशात माध्यमाना मुलाखत देताना राखी सावंत म्हणाली की, ‘ती पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेणार आहे, जेव्हा कंगना रनोतला सुरक्षा मिळू शकते, तर मला का नाही.’ असे राखी सावंतचे म्हणणे हाेते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

राखी सावंतने स्वत:साठी झेड सुरक्षेची मागणी केल्याचे समजताच चाहत्यांना हसू आले. राखीच्या समोर आलेल्या व्हिडीओची त्यांनी बरीच खिल्ली उडवली. एका युजरने कमेंट केली की, “आता मोदीजींना एवढेच काम उरले आहे, मर्यादा आहे यार.” अशाप्रकरे साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर भिन्नभिन्न कमेंट करत आहेत.(dramaqueen rakhi sawant demands z security for herself says she will meet pm modi)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
लॉकडाऊनच्या आठवणींना उजाळा देणारा राजेश गुप्ता दिग्दर्शित ‘अनलॉक जिंदगी’ हा चित्रपट ‘या’ दिवशी हाेणार रिलीज
‘परिनिर्वाण’मधून उलगडणार नामदेव व्हटकर यांच्या आयुष्यातील संघर्षमय प्रवास…

हे देखील वाचा