Tuesday, April 23, 2024

चाहत्याचा फोन हिसकावून पळाली राखी सावंत, ‘ड्रामा क्वीन’चं ‘हे’ कृत्य पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध ‘ड्रामा क्विन’ राखी सावंत तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे आणि एक्टिविटीमुळे चर्चेत असते. अशात ड्रामा क्वीन उघडपणे चाहत्यांचे फोन चोरताना दिसली, ज्याचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून त्यांनी राखीला चांगलेच ट्राेल केले आहे.

राखी सावंतचा लेटेस्ट स्पॉट केलेला व्हिडिओ एका पॅपराझींने शेअर केला आहे, या व्हिडिओमध्ये राखी निळ्या रंगाचा डेनिम को-ऑर्डर सेट परिधान करून अतिशय बोल्ड दिसत आहे, ज्यामध्ये ब्रॅलेट आणि बाजूला स्लिट्स असलेली फ्लेर्ड पँट आहे. तर झाले असे की, फोटो क्लिक करण्यादरम्यान राखीने तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांना फटकारले. इतकंच नाही, तर राखीने ते फाेन हिसकावले आणि गोळा करून गाडीकडे धाव घेतली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राखी सावंतचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटिझन्स प्रचंड संतापले आहेत. फोन हिसकावून घेतल्यानंतर राखी सावंतला हसताना पाहून एका युजरने लिहिले की, ‘फॅनचा फोन घेऊन पळून जाण्याचा हा काय प्रकार आहे.’, तर दुसर्‍याने लिहिले आहे की, ‘ही सर्व फालतू नाटके आहेत. कोणीतरी त्यांच्या हास्यास्पद कपड्यांकडेही लक्ष द्या.’ अशात एकाने कमेंट करत लिहिले की, ‘देवाचा आभारी आहे की, आदिल खान वाचला.’ त्याचप्रमाणे इतर युजर्सही राखी सावंतवर कमेंट करत टीका करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by TellyMasala (@tellymasala)

अलीकडेच, एका रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, राखी सावंतला सलमान खानशी संबंधित धमकीचा ईमेल आला आहे, ज्यामध्ये तिला ‘या प्रकरणापासून दूर राहा’ असे सांगितले आहे. ही टोळी सलमानला मुंबईत मारण्याची याेजना रचत असल्याचे मेलमध्ये लिहिले आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, ड्रामा क्वीनला मिळालेला धमकीचा मेल गुर्जर प्रिन्स नावाच्या व्यक्तीमार्फत पाठवण्यात आला होता, जो लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा दावा करतो.( bollywood actress rakhi sawant ran away after snatching fans phone netizens got angry after seeing the action )

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘हे’ सुपरस्टार आजही करतात शेती, कलाकार म्हणतो की, ‘शेण उचलल्याशिवाय दिवस सुरू होत नाही….,’

तामिळ परिवारात जन्मूनही अस्खलित मराठी बोलणाऱ्या सुमित राघवनने भूतदया दाखवत घेतले चक्क वाघालाच दत्तक

हे देखील वाचा