Sunday, December 8, 2024
Home टेलिव्हिजन राखी अन् आदिलच्या लढाईत अभिनेत्रीच्या एक्स पतीचा हस्तक्षेप; म्हणाला, ‘ती या गोंधळात…’

राखी अन् आदिलच्या लढाईत अभिनेत्रीच्या एक्स पतीचा हस्तक्षेप; म्हणाला, ‘ती या गोंधळात…’

राखी सावंत सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे माेठ्या प्रमाणात चर्चेत आहे. तिने पती आदिल दुर्रानी याच्यावर फसवणूक आणि मारहाणीचा आरोप केला आहे. यासंदर्भात पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भादंवि कलम 406 आणि 420 अंतर्गत गुन्हा दाखल केला हाेता. ज्यानंतर न्यायालयाने आदिलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पोलीस आदिलची चौकशी करत आहेत. दरम्यान, राखीचा एक्स पती रितेश राज सिंग राखीला पाठिंबा देत आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत आदिल-राखीबद्दल बोला आहे.

या व्हिडिओमध्ये रितेश सिंगने सांगितले की, “आदिल दुर्राणीशी माझे कोणतेही वैर नाही. मला राखी सावंतसोबत परत यायचे नाही, पण मी तिचे समर्थन करतो.” यासाेबत रितेशने राखीसोबत घडलेल्या घटनांबद्दल दु:ख व्यक्त केले. राखी खरी असल्याचे त्यांनी सांगितले. ती कोणावरही हात उचलू शकत नाही. असे रितेशचे म्हणणे आहे. मात्र, पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून त्याला यावर काेणतेही कमेंट करायची नाही असे रितेशचे म्हणणे आहे.

आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यातील भांडणाबद्दल रितेश सिंगने माध्यमांशी संवाद साधला. तो म्हणाला, “ती या गोंधळात कशी अडकली हे मला माहीत आहे, पण तिने याआधी बोलायला हवे. त्यानंतर मी या प्रकरणात हस्तक्षेप करेन.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ritesh Raj (@ritesh.raj_singh)

रितेश सिंग पुढे म्हणाला, “राखी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे. माझ्या आई-वडिलांनंतर फक्त राखी सावंतनेच माझ्यावर खूप प्रेम केले.” राखीने आदिलच्या गैरवर्तनाबद्दल त्याच्याशी बोलल्याचा खुलासाही त्याने केला. रितेशने राखीला सल्ला दिला होता की, ‘आता अशा मुलाला पकड, जो तुला सांभाळेल.’

रितेश सिंग म्हणाला, “राखीला माझ्याबद्दल सर्व काही आधीच माहित होते. त्यामुळे मी तिला कधीच फसवले नाही. मी माझी लव लाइफ संपवली आहे. मी खूप भावनिक व्यक्ती आहे. त्यामुळे मला पुन्हा वेदनेतून जायचे नाही.

राखी सावंत हिने साेशल मीडियाच्या माध्यमातून आदिल दुर्रानीशी लग्न झाल्याचा खुलासा केला हाेता.(dramaqueen rakhi sawant ex husband ritesh raj singh reacts on adil khan durrani interfaith wedding controversy drama queen cries inconsolably)

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
अंतिम फेरीच्या आधी बिग बॉसच्या घरात झालेली ‘या’ व्यक्तीची एन्ट्री, स्पर्धकांसाठी धोक्याची घंटा

कियारा अन् सिडच्या लग्नात जुही चावलाचा जलवा पाहिलात का?

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा