Friday, July 5, 2024

राखीचा दारुच्या नशेतला ‘ताे’ व्हिडिओ व्हायरल; युजर्स ‘ड्रामाक्वीन’ची खिल्ली उडवत म्हणाले…

राखी सावंत तिच्या अनाेख्या शैलीसाठी ओळखली जाते. पडद्यावरचे नाटक असो किंवा पॅपराझींच्या कॅमेऱ्यांसमोरचे नाटक असो, राखी प्रत्येक वळणावर एक पाऊल पुढेच असते. अशातच आता राखी सावंतचे असेच काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, जे लोकांचे मनोरंजन तर करत आहेत आणि यासाेबतच सर्वांनाच आश्चर्याचा धक्काही देत आहेत. या व्हिडिओंमध्ये राखी सावंत फारच विचित्र कृत्य करत आहे, ज्यामुळे ‘ड्रामाक्विन’ चांगलीच चर्चेत आली आहे.

तर झाले असेक की, मुदस्सर खान आणि मालविका राज यांच्या ‘शराबी’ या नवीन गाण्याचे लाँच हाेते, ज्यामध्ये राखी कॉर्सेट ड्रेसमध्ये दिसली. यावेळी राखी पिंग पॉंग गर्ल म्हणून आली हाेती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

व्हिडिओमध्ये राखी सावंत म्हणताना दिसत आहे, ‘आज मी 25 वर्षांची झाली आहे.’ राखी सावंत पुढे म्हणते, ‘मी लिफ्टने जाईन.’ यावर पॅपराझी तिला सांगातात की, ‘लिफ्ट नाही. पहिल्या मजल्यावर जायचे आहे, पायऱ्यांनी जावे लागेल.’ यानंतर राखी तिची चप्पल काढते आणि पायऱ्या चढू लागते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

दुसर्‍या व्हिडिओमध्ये राखीला विचारले जाते की, ‘ती आज कोणत्या लूकमध्ये आली आहे?’, ज्यावर ती म्हणते की, ‘आज मी पिंग पॉंग लूकमध्ये आहे’. यानंतर राखी डान्स करून दाखवते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

याच कार्यक्रमातील राखीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ड्रिंकचा ग्लास डोक्यावर घेऊन नाचताना दिसत आहे. हे व्हिडीओ पाहिल्यानंतर साेशल मीडिया युजर्स अभिनेत्रीच्या व्हिडिओवर कमेंट करत म्हणत आहे की,’आदिल वाचला आहे असे दिसते.’ (dramaqueen rakhi sawant took off her high heels sandal and was seen dancing with drink glass in her hand front of the camera)

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘TDM’ सिनेमाला स्क्रीन मिळत नसल्याने कलाकारांना अश्रू अनावर, दिग्दर्शक म्हणाले, “अशा भेदभावामुळे माझी चित्रपट बनवण्याची… ”

‘नुकतेच मी माझे घर विकले’ आर्यन खानचा ब्रँड म्हणजे निव्वळ मस्करी, किंमती एकल तर हैराण व्हाल

हे देखील वाचा