बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा अंमली पदार्थ प्रकरणी जामीन बुधवारी (२० ऑक्टोबर) पुन्हा फेटाळण्यात आला आहे. १६ दिवसांत चौथ्या वेळेस न्यायालयाने शाहरुखच्या मुलाला जामीन देण्यास नकार दिला आहे. आर्यन, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ३ ऑक्टोबर रोजी एनसीबीच्या टीमने अं’मली पदार्थांचा ताबा, षडयंत्र, सेवन, खरेदी आणि तस्करीच्या आरोपाखाली अटक केली होती. तिघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्यांची न्यायालयीन कोठडी गुरुवारी संपत आहे. आर्यनच्या जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.
मुलाला तुरुंगात भेटायला पोहोचला शाहरुख खान
मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात अनेक दिवसांपासून बंदिस्त असलेल्या आर्यनला भेटायला प्रथमच शाहरुख पोहोचला. मुलाला भेटल्यानंतर शाहरुख त्याला १५ मिनिटे बोलला. शाहरुखने कारागृहातून बाहेर येताना माध्यमांशी बोलणे टाळले.
आर्यनसह इतर ३ आरोपींची जामीन याचिका फेटाळत न्यायालयाने काय म्हटले जाणून घेऊया-
-सर्व तथ्ये प्रथमदर्शनी दाखवतात की, आरोपी आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा यांनी एकमेकांसोबत एकाच षडयंत्रात काम केले आहे. तपासात सर्व आरोपी एकाच धाग्यात जोडलेले असल्याचे उघड झाले आहे.
-आर्यनकडून कोणतीही रिकव्हरी झाली नसली, तरी तो ‘मोठ्या नेटवर्क’चा भाग असल्याचे दिसते. अशाप्रकारे जप्त केलेल्या अं’मली पदार्थांना मोठ्या प्रमाणासाठी तो जबाबदार आहे. म्हणजेच क्रूझवर अं’मली पदार्थ घेतले जातील याची आर्यनला जाणीव होती.
-आर्यनचा कोणताही गुन्हेगारी इतिहास नसला, तरी त्याच्या व्हॉट्सॲप चॅट्सवरून तो बेकायदेशीर अं’मली पदार्थ ॲक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होता हे उघड होते. आर्यनच्या अज्ञात व्यक्तींशी व्हॉट्सॲप चॅट ‘बल्क क्वांटिटी’ आणि ‘हार्ड अं’मली पदार्थां’बद्दल बोलले आहे.
-व्हॉट्सॲप चॅटच्या स्वरूपात आक्षेपार्ह सामग्री आर्यन खानचा अं’मली पदार्थ पुरवणारा आणि अं’मली पदार्थ विक्रेत्यांशी संबंध दर्शवत आहे. आर्यनच्या व्हॉट्सॲप चॅटवरून प्रथमदर्शनी असे दिसून येते की, तो नियमितपणे अं’मली पदार्थ संबंधित योजनांचा भाग होता.
अशात आता आर्यनचा जामीन फेटाळल्यामुळे शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाच्या चिंतेत आणखी वाढ झाली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-आर्यनला जामीन न मिळाल्यामुळे ट्विंकल खन्ना संतापली; म्हणाली, ‘त्याला तुरुंगात सडवले जात आहे’
-अनन्या पांडेच्या घरी NCB अधिकारी, चौकशीसाठी अभिनेत्रीला समन्स