Wednesday, July 3, 2024

असाच नव्हता मिळाला शाहरुखला पहिला ब्रेक, किंग खानला करिअरसाठी मान्य करावी लागली होती ‘ही’ अट

सुपरस्टार शाहरुख खानने (Shah Rukh Khan ) आतापर्यंत ‘जब तक है जान’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘बाजीगर’ आणि ‘माय नेम इज खान’ यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. किंग खानची भारतातच नाही, तर परदेशात देखील जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे. ‘जीरो’ चित्रपटानंतर शाहरुख भलेही कोणत्याही चित्रपटात दिसला नसेल, पण त्याच्या आगामी चित्रपटांची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

त्याचबरोबर शाहरुख खानने चित्रपटसृष्टीत कोणत्याही गॉडफादरशिवाय आपल्या मेहनतीच्या जोरावर यश मिळवले आहे, हे आपणा सर्वांना माहीत आहे. मात्र, त्याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, अभिनयाच्या दुनियेत एंट्री घेण्यासाठी शाहरुख खानला एक अट पूर्ण करावी लागली. इच्छा नसताना देखील त्याने ती अट मान्य केली

शाहरुख खानने आपल्या करिअरची सुरुवात ‘फौजी’ या टीव्ही सीरियलमधून केली होती, हे आपणा सर्वांना माहीत आहे. पण हे योग्य नाही. किंग खानचा हा पहिला ब्रेक नव्हता. खरं, तर शाहरुख खान याआधी १९८८ मध्ये ‘दिल दरिया’ या टीव्ही मालिकेत दिसला होता आणि शोचे निर्माते लेख टंडनने या शोमध्ये भूमिका देण्यासाठी त्याच्यासमोर एक अट ठेवली होती.

माध्यमांतील वृत्तानुसार, निर्मात्याने शाहरुखला त्याचे लांब केस कापण्यास सांगितले आणि शाहरुखला त्याच्या केसांवर खूप प्रेम होते. मात्र, दु:खी मनाने शाहरुखला निर्मात्यांची ही अट मान्य करून केस कापावे लागले.

मात्र शाहरुख खानला टीव्ही शो ‘फौजी’ मधून ओळख मिळाली. त्यानंतर किंग खान मुंबईत आला आणि  त्याने आपल्या करिअरमध्ये मागे वळून पाहिले नाही. शाहरुख खान आज ज्या यशाच्या उंचीवर आहे त्या उंचीवर पोहोचण्याचे प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते. त्याचवेळी किंग खानच्या आगामी चित्रपटांबद्दल बोलायचे, तर लवकरच तो जॉन अब्राहम (John Abraham) आणि दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) ‘पठाण’ चित्रपटात दिसणार आहे.

शाहरुख २०१८ साली ‘जीरो’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात त्याच्यासोबत कॅटरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनुष्का शर्माही (Anushka Sharma) दिसल्या होत्या. पण हा चित्रपट फ्लॉप ठरला. यानंतर शाहरुख खान कोणत्याही चित्रपटात दिसला नाही आणि आता तो थेट ‘पठाण’मध्ये दिसणार आहे. ‘पठाण’ व्यतिरिक्त शाहरुख खान साऊथ डायरेक्टर एटली आणि राजकुमार हिरानी यांच्या चित्रपटातही दिसणार आहे. मात्र, या चित्रपटांची अधिकृत घोषणा झालेली नाही.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा – 

हे देखील वाचा