Thursday, April 25, 2024

प्रभास म्हणतोय, ‘मी सांगितलेली भविष्यावाणी कधीच ठरत नाही खोटी’, वाचा नक्की काय आहे प्रकरण

बॉलिवूड आणि टॉलिवूड अश्या दोन्ही चित्रपट क्षेत्रात आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवरती छाप पाडणारा अभिनेता म्हणजे प्रभास. त्याची लोकप्रियता ही प्रचंड असून, त्याचा ‘राधेश्याम’ हा चित्रपट सध्या जोरदार चर्चेत आहे. सध्या बिग बजेट चित्रपटाचे वारे मनोरंजन विश्वात वाहत आहेत. प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहांमध्ये आणण्याचा प्रयत्न प्रत्येक दिग्दर्शक करत आहेत. जवळ जवळ हा चित्रपट ३५० कोटीच्या घरात असल्याने ‘राधेश्याम’ हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांवर प्रभाव पाडेल असा दावा निर्मात्यानी केला आहे.

राधे श्याम हा चित्रपट एका प्रेम कहाणीवर आधारीत आहे. चित्रपटातील प्रियकर आणि प्रियसी यांना त्यांच्या हातावरच्या रेषा एकमेकांना कधीच भेटू देणार नाही. ज्याच नशीब नेहमीच एकमेकांपासून वेगळ करण्याचा कट रचतो. विक्रम आदित्य ( प्रभास) आणि प्रेरणा (पुजा हेगडे) याची प्रेमकहाणी आहे. विक्रम हा हताच्या रेषा पाहून भविष्य सांगतो. त्याने सांगितलले भविष्य कधीच खोट ठरु शकत नाही. असं त्या चित्रपटात दाखवण्यात आले आहे. पुढे काय होणार हे त्याला आधीच माहिती असते. याच शक्तीने विक्रमला समजत की, त्याला आयुष्यात प्रेम कधीच होऊ शकत नाही. दुसरीकडे प्रेरणा ही डॉक्टर आहे. तिचा या भविष्यावाणी वर अजिबात विश्वास नसतो. हा संपूर्ण चित्रपट कथानायक आहे. हा चित्रपट हिंदी आणि तेलगु भाषेत आहे.

दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार मुळातच लेखनीचे धनी मानले जातात. त्याने सात वर्षापूर्वी दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट लिहला. ‘बाहुबली’ हा चित्रपट केल्यानंतर प्रभासला काहीतरी हटके प्रोजेक्टसमध्ये काम करायचे होते. त्याचवेळेस त्याच्या हाती पडली राधे श्याम या चित्रपटाची कथा. प्रभासचा ‘साहो’ हा चित्रपट २०१७ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमात प्रेक्षकांना अॅक्शन सीन पाहायला मिळतील. या चित्रपटाचं बजेट ३५० कोटी इतकं होत. ‘राधेश्याम’ या चित्रपटाचा बजेटही तितकाच आहे. राधे श्याम हा चित्रपट ११ मार्च ला प्रदर्शित झाला आहे.

दैनिक बोंबाबोंचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा