Friday, March 29, 2024

रेस्टॉरंटमध्ये गाणे गाऊन आतिफ असलम बनला सुपरस्टार, ‘तेरा होने लगा हू’ गाण्याला होता परदेशातून विरोध

आपल्या सुरेल आवाजाने सगळ्यांना मंत्रमुग्ध करणारा गायक आतिफ असलम आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्याने त्याच्या गाण्याने तरुणाईला वेड लावले आहे. अशातच रविवारी (12 मार्च) रोजी त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. चला तर मग वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया गायकाबाबत काही माहिती.

आतिफ असलम याचा जन्म 12 मार्च 1983 रोजी झाला. त्याने भारतात नाही, तर अगदी विदेशात देखील अनेक प्रोग्राम केले आहेत. मात्र, हे ऐकून अनेकांना आश्चर्य वाटेल की, आतिफ जेव्हा 14 वर्षाचा होता, तेव्हा तो दहावी पास झाला होता. दहावी पास होणार तो तेव्हाचा पहिला सगळ्यात लहान विद्यार्थी होता. त्याने सुरुवातीला त्याचे शिक्षण लाहोरमधील कोंबली हाय स्कूलमधून पूर्ण केले. शाळेत असताना त्यांना क्रिकेटची खूप आवड होती. संगीतात त्याला जास्त काही रस नव्हता. ( Singer Atif Aslam celebrate his birthday, let’s know about his career)

आतिफ असलमला बॉलिवूडमध्ये महेश भट्ट यांनी पहिला ब्रेक दिला. त्याने 2005 मध्ये ‘जहर’ या चित्रपटासाठी ‘वो लम्हे’ हे गाणे गायले. त्याचे हे गाणे सुपरहिट झाले आणि त्याला बेस्ट बॅकग्राउंड सिंगर आइफा अवॉर्ड मिळाला. त्यानंतर त्याला बॉलिवूडमध्ये अनेक गाणी गाण्याची संधी मिळाली. ‘बेइंतहा’, ‘पहली नजर मे’, ‘तू जाने ना’, ‘तेरे संग यारा’ यांसारखी अनेक सुपरहिट गाणी त्याने गायली आहेत. त्यापैकी ‘बदलापूर’ चित्रपटातील ‘जीना जीना’ हे गाणे सुपरहिट झाले होते. त्यांनी २०११ मध्ये ‘बोल’ या चित्रपटातून अभिनय पदार्पण केले.

रणबीर कपूर आणि कॅटरिना कैफ यांच्या ‘अजब प्रेम की गजब कहाणी’ या चित्रपटातील ‘तेरा होने लगा हू’ हे गाणे आतिफ असलमने गायले. त्याच्या या गाण्याला खूप प्रेम मिळाले. जेव्हा आतिफने पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनी न्यूयॉर्कमध्ये गाणे गायले, तेव्हा त्याला विरोध करण्यात आला होता. लोकांचे असे म्हणणे होते की, पाकिस्तानच्या स्वतंत्रदिनी भारताच्या चित्रपटातील गाणे म्हणणे चुकीचे आहे. यानंतर त्याने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करून ‘नो चांस टू गिव्ह अप,’ असे लिहिले होते.

आतिफ असलमने रेस्टॉरंटमधून गाण्यास सुरुवात केली होती. जेव्हा त्याने त्याच्या मित्रांना गाताना पाहिले तेव्हा त्याला देखील गाण्याची इच्छा झाली. त्यानंतर तो संगीतकार मुमताजला भेटला. मग ते दोघे रेस्टॉरंटमध्ये गाणे गायला लागले आणि त्या दोघांनी एक बॅंड तयार केला. त्यानंतर आतिफचा ‘जल’ नावाचा एक अल्बम आला. काही दिवसातच हा अल्बम पाकिस्तानी म्युझिक वेबसाईटवर लोकप्रीय झाला. त्यानंतर तो खूपच प्रसिद्ध झाला.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘नापतोल व्हर्जन ऑफ कंगना’ म्हणत नेटकऱ्यांनी केले ऋतिक रोशनची गर्लफ्रेंड असणाऱ्या सबा आझादला ट्रोल

शालेय दिवसांमध्ये श्रद्धा करायची परिक्षेत चीटिंग? अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

हे देखील वाचा