मागील काही दिवसापासून मनोरंजनविश्वातून कोणाच्याही लग्नाची बातमीच नव्हती. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतही अनेक कलाकारांनी त्यांची लगीनगाठ बांधून नवीन आयुष्याला सुरुवात केली. आता या यादीत अजून एका क्यूट जोडप्याची भर पडणार आहे. सध्या सेन्सेशन बनलेले एक कपल म्हणजे राहुल वैद्य आणि दिशा परमार. येत्या १६ जुलैला हे जोडपे विवाहबंधनात अडकणार आहेत. सध्या या दोघांच्या घरी लगीनघाई सुरू आहे.
नुकताच दिशाचा मेहंदीचा कार्यक्रम संपन्न झाला आहे. या कार्यक्रमाचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये तिच्या हातावर मेहंदी काढली जात असून, ती बसलेल्या ठिकणी ‘दुल्हनिया’ लिहिलेले दिसत आहे. दिशाने तिच्या या कार्यक्रमावेळी दिशाने गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा स्लिप शरारा घातला होता, ज्यावर मिरर वर्क केले होते. दिशाचा हा लूक आणि तिचे मेहंदीच्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय बनले आहेत.
दिशाने तिची मेहंदी झाल्यानंतर राहुलसोबत बाहेर येऊन फोटोग्राफर्सला पोझ दिल्या. यावेळी दिशा आणि राहुल यांच्या चेहऱ्यावर लग्नाबद्दलचा उत्साह आणि आनंद स्पष्ट दिसत होता. यावेळी राहुलने ग्रे रंगाचा सॅटिनचा कुर्ता आणि पायजमा घातला होता. हे दोघंही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करताना दिसली. दिशा आणि राहुलने यावेळी मीडियासोबत चर्चा करत भरपूर फोटो देखील काढले.
नुकतेच या दोघांना लग्नाची शॉपिंग करताना स्पॉट करण्यात आले होते. राहुल आणि दिशाच्या संगीत रिहर्सलचे काही व्हिडिओ समोर आले होते. ज्यात ते संगीत सेरेमनीची जोरदार तयारी करताना दिसले. संगीत सोहळ्याची जय्यत तयारी करताना दिसत आहेत. हे कपल आणि सोलो असे दोन परफॉर्मन्स करणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाचे संकट बघता हे लग्न मोजक्या लोकांच्या उपस्थितीत मात्र धुमधडाक्यात होणार आहे.
‘बिग बॉस १४’ मधून लोकप्रियता मिळवणारा गायक राहुल वैद्य आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री दिशा परमार यांची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. ‘बिग बॉस’ नंतर चाहत्यांना राहुल आणि दिशाच्या लग्नाचे वेध लागले होते. सोशल मीडियावर या दोघांनी त्यांच्या लग्नाच्या तारखेची घोषणा करत सर्वांना सुखद धक्का दिला होता.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-