श्रीलंकन ब्युटी असणाऱ्या जॅकलिन फर्नांडिसने अगदी कमी काळात तिच्या अभिनयाच्या आणि सौंदर्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये तिचे स्थान निर्माण केले. आज ती बॉलिवूडमधल्या आघाडीच्या अभिनेत्रींमधील एक अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. नेहमी वेगवेगळ्या गोष्टींमुळे चर्चेत असते. मात्र आता जॅकलिन एक वेगळ्या आणि मोठ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकत असल्याचे दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ED) जॅकलिनची ३० ऑगस्ट रोजी कसून चौकशी करण्यात आली आहे.
प्राप्त माहितीनुसार जॅकलिनची सोमवार ३० ऑगस्ट रोजी २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकारासंबंधित चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीत तिने अनेक खुलासे केले आहेत. मात्र जॅकलिन स्वतः या फसवणुकीची शिकार झाली आहे. तिची चौकशी एक साक्षीदार या नात्याने करण्यात आली.
या चौकशीमध्ये तिने अनेक मोठे आणि महत्वाचे खुलासे केले आहेत. दिल्लीमध्ये झालेल्या या पाच तास चौकशीमध्ये समोर आले की, हे प्रकरण कॉनमॅन सुकेश चंद्रशेखर यांच्याशी संबंधित असून, सुकेशने त्याची पार्टनर असलेल्या लीना पॉलच्या मदतीने जॅकलिनला निशाणा बनवले गेले. सुकेशवर मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल आहे.
टीजीओआईच्या रिपोर्टनुसार जॅकलिनची झालेली चौकशी ही एक साक्षीदार या नात्याने करण्यात आली आहे. या चौकशीतून समोर आले की, सुकेशने बॉलिवूडच्या आजू एका कलाकाराला देखील फसवले आहे. मात्र या अभिनेत्याच्या नावाचा अजून उलगडा झाला नाही. २४ ऑगस्ट रोजी ईडीने चेन्नईमध्ये एका बंगल्यावर छापेमारी केली होती, जिथून ८२ लाख रुपयांची रोकड आणि १२ पेक्षा अधिक आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत.
या प्रकरणाबाबत ईडीने सांगितले की, ‘सुकेश हा वयाच्या १७ व्या वर्षापासूनच फसवणुकीच्या सर्व कृत्यांमध्ये सहभागी असायचा. त्याच्याविरोधात अनेक प्रार्थमिक दरवाजाचे गुन्हे दाखल आहेत. तो अनेकदा तुरुंगात देखील गेला, पण तरी तो सुधारला नाही. लोकांना फसवण्याचा काम सोडले नाही.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘राधा कैसे ना जले…’, म्हणत ‘धकधक गर्ल’ने पुन्हा एकदा चुकवला चाहत्यांचा काळजाचा ठोका
-‘या’ कलाकारांनी किस करून लावली होती पडद्यावर आग; आमिर अन् करिश्माचाही आहे समावेश
-‘दिल को करार आया!’ तुझ्यात जीव रंगला फेम ‘वहिनीसाहेबां’चे एक्सप्रेशन्स पाहुन चाहते झाले पुरते घायाळ