Monday, July 1, 2024

टायगर सोबतच्या ब्रेकअपनंतर दिशा झाली खुपच बोल्ड, व्हायरल फोटो पाहून फुटेल घाम

बॉलिवूड जगतात सध्या अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) यांच्या ब्रेकअपची जोरदार चर्चा रंगली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर आल्या होत्या ज्याची माध्यमांमध्ये चर्चा झाली होती. टायगर आणि दिशाच्या प्रेमप्रकरणाबद्दल त्या दोघांनी कधीही अधिकृत माहिती दिली नसली तरी त्यांचे प्रेम काही चाहत्यांपासून लपून राहिले नव्हते. आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या समोर येत असतानाच दिशाच्या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तिच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलेच मोहित केले आहे. 

दिशाच्या या लेटेस्ट लूकबद्दल सांगायचे तर, अभिनेत्री अतिशय टाइट वन पीस ड्रेसमध्ये दिसत आहे. यासोबतच ड्रेसमधील मेश कटमुळे ती अधिक बोल्ड दिसत आहे. जर तुम्ही कमेंट सेक्शन बघितले तर दिशाच्या या सिझलिंग स्टाईलवर नेटिझन्सनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. तिच्या या फोटोंवर चाहते घायाळ झालेले पाहायला मिळत आहे. या व्हायरल पोस्टमध्ये दिशा पटानीने तिच्या बेडरुममध्ये बोल्ड पोझ करताना दिसत आहे.

 

दिशा पटानीने 3 तासांपूर्वी हे फोटो शेअर केले आहेत. त्याला 640000 हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तर त्यावर 500 हून अधिक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी फोटोंवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर केले आहेत. तर अनेकांनी हॉट बेबी, व्वा, लव्ह यू, अमेझिंग, हॉट, लुकिंग एक्सट्रीमली गॉर्जियस अशा कमेंट केल्या आहेत. दिशा पटनी एक चित्रपट अभिनेत्री आहे. तिने अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिचे चित्रपट चांगलेच पसंत केले गेले आहेत.

हेही वाचा –लागोपाठ दोन सिनेमांच्या रिलीझपूर्वीच विक्रमने ट्विटरवर उघडले अकाऊंट, झटक्यात वाढले ‘एवढे’ फॉलोव्हर्स
सुपरहिट ‘उ अंटावा’ गाण्याचे भोजपुरी वर्जन तुम्ही पाहिले का? व्हायरल व्हिडिओने लावले नेटकऱ्यांना वेड
आख्ख्या जगाने काढलेली आठवण एकीकडे अन् पोटच्या लेकीने काढलेली आठवण दुसरीकडे, जान्हवीची भावूक पोस्ट व्हायरल

हे देखील वाचा