Tuesday, March 5, 2024

एकनाथ शिंदे यांनी ‘धर्मवीर 2’ बाबत दिली मोठी हिंट; म्हणाले, ‘दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असेल…’

आजकाल मराठी चित्रपटांची प्रेक्षकांना चांगलीच भुल घातलेली आहे. अनेक नवीन चित्रपट येत आहेत आणि प्रेक्षकांना ते पसंत देखील पडत आहेत. एक वर्षांपूर्वी अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) मुख्य भूमिकेत असणाऱ्या ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट रिलीज झाला होता. आणि तो सगळ्यांना खूप आवडला होता. शिवसेना सैनिक आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे देखील खूप प्रेम मिळाले. पहिला भाग प्रदर्शित झाल्यानंतर प्रसाद ओक यांनी दुसऱ्या भागाची देखील घोषणा केली.

नुकतेच या चित्रपटाच्या शूटिंगचा मुहूर्त सोहळा पार पडला. आणि या शहराला माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील हजेरी लावली होती यावेळी कार्यक्रमात बोलताना एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर 2 बाबत मोठ विधान केलं आहे.

‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’ नंतर ‘धर्मवीर 2: साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट’ यामध्ये काय पाहायला मिळणार आहे याबाबत प्रेक्षकांमध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे. पहिल्या भागामध्ये आनंद दिघे यांची राजकीय कार्य परंतु त्यामध्ये आनंदी यांचे निधन झाले. परंतु आता दुसऱ्या भागात नेमके काय होणार आहे? याकडे सगळ्या प्रेक्षकांचे लक्ष आहे. परंतु आता एकनाथ शिंदे यांनी याबाबत स्वतः खुलासा केला आहे.

यावेळी ते म्हणाले की, “दिघे साहेब असताना मी नगरविकास मंत्री होतो. दुसऱ्या भागात मी मुख्यमंत्री असणे असे शिंदे यांनी सांगितले.”

‘धर्मवीर 2’च्या मुहूर्त सोहळ्यात बोलताना मुख्यमंत्र्यांनी प्रसाद ओक याचे देखील खूप कौतुक केलं. ते म्हणाले की, “प्रसादने जीव ओतून या भूमिकेसाठी काम केले आहे. त्याने आनंद दिघेंना कधी पाहिलं नाही त्यांना तो कधी भेटला नाही. पण त्यांनी त्यांची भूमिका उत्तम रित्या साकारली. असे म्हणत एकनाथ शिंदेंनी या कार्यक्रमात प्रसाद ओके देखील मोठ्या प्रमाणात कौतुक केले.

आता एकनाथ शिंदेंच्या या वक्तव्यानंतर सगळ्यांना धर्मवीर 2 हा सिनेमा पाहण्याची मोठी उत्सुकता लागली आहे. या सिनेमाचा लेखन आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे करणार आहे. आणि 2024 मध्ये हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

व्हायरल डीपफेक व्हिडिओबाबत रश्मिका मंदान्नाची पहिली प्रतिक्रिया काय होती? अभिनेत्रीने केला खुलासा
पार्ट्यांमध्ये जाऊन फोटो काढण्यासाठी ऑरी घेतो २० ते ३० लाख रुपये, स्वतः केला खुलासा

हे देखील वाचा