एल्विश यादव (Elvish Yadav)हे गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. दरम्यान, त्याच्यासंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेव्ह पार्टीत सापांचे विष वापरल्याची माहिती FSL रिपोर्टमधून समोर आली आहे.
गेल्या वर्षी एल्विश यादववर काही गंभीर आरोप करण्यात आले होते. एल्विश यादवच्या रेव्ह पार्टीत अनेक सापांचे विष आढळले. सापांच्या विषाची नशा या पार्टीत केली गेली. नोएडामध्ये रेव्ह पार्टीचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी ५ जणांना अटक करण्यात आली होती. आता या प्रकरणी FSL रिपोर्ट समोर आला आहे. त्यामध्ये मोठा खुलासा झाला आहे.
नोएडा पोलिसांनी सर्पमित्रांच्या ताब्यातून जप्त केलेले सापाचे विष FSL लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल आता आला आहे. एफएसएल तपासात मोठा खुलासा झाला आहे. कोब्रा क्रेट प्रजातीच्या सापांचे विष सापडले आहे. FSLचा अहवाल आल्यानंतर एल्विश यादवच्या अडचणीत वाढ होऊ शकते.
एल्विश यादव हा एक फेमस यूट्यूबर आहे. शॉर्ट चित्रपटांची देखील एल्विश यादव हा निर्मिती करतो. एल्विश याचे एक चॅनल देखील आहे आणि या चॅनलच्या माध्यमातून तो आपल्या लाईफबद्दल चाहत्यांना अपडेट देताना दिसतो. गुरुग्राम जवळच्या वजीराबाद येथील रहिवाशी आहे. दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतले आहे. एल्विश यादव हा बिग बॉस ओटीटी 2 चा विजेता देखील आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
‘तेव्हा धर्मेंद्र यांनी लिफ्टमध्येच ‘त्या’ व्यक्तीला मारलं; जॉनी लिव्हरने सांगितला मजेशीर किस्सा
‘मला माझ्या आईच्या त्या सवयीचा त्रास होतो’; श्वेताने जया बच्चनबद्दल केला मोठा खुलासा