आपल्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) आता रणबीर कपूरबद्दल वक्तव्य केले आहे. कंगनाचे म्हणणे आहे की, तिला संजू चित्रपटात काम करण्याची ऑफर आली होती, पण तिने नकार दिला. हा चित्रपट राजकुमार हिरानी यांनी दिग्दर्शित केल्याची माहिती आहे.
कंगना रणौतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, रणबीर कपूर स्वतः तिच्याकडे ‘संजू’मध्ये काम करण्याचा प्रस्ताव घेऊन आला होता. ती म्हणाली की रणबीर त्याच्या घरी आला आणि म्हणाला, ‘कृपया संजूमध्ये काम कर.’ कंगनाने सांगितले की, ज्या लोकांना तिने जाहीरपणे काही सांगितले आहे किंवा त्यांच्या ऑफर नाकारल्या आहेत, त्यामुळे तिच्या व्यावसायिक जीवनात काहीही फरक पडत नाही.
कंगनाने सांगितले की, रणबीरने तिच्यासाठी एक भूमिका आणली होती, पण ती कोणती भूमिका आहे हे तिने सांगितले नाही. संजूमध्ये रणबीर कपूरशिवाय अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर यांनीही काम केले होते. कंगनाने रणबीर कपूरच्या ॲनिमल या चित्रपटावरही टीका केली आहे.
याच मुलाखतीत कंगनाने सलमान खानच्या ‘बजरंगी भाईजान’ आणि ‘सुलतान’ या सिनेमांच्या ऑफर नाकारल्याचंही सांगितलं होतं. कंगनाचा नवीन चित्रपट ‘इमर्जन्सी’ 6 सप्टेंबर 2024 रोजी रिलीज होणार आहे. हा चित्रपट आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर आधारित असून यात कंगना रणौत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. याचे दिग्दर्शन कंगना रणौतने केले आहे. दिवंगत सतीश कौशिक, मिलिंद सोमण, श्रेयस तळपदे, महिमा चौधरी आणि अनुपम खेर यांच्यासह अनेक कलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
तुम्ही बिग बॉस मराठीच्या इतिहासात एक वाईट सदस्य आहात! जान्हवीवर रितेशचा संताप अनावर…
शरीर तिचं आहे, निर्णय सुद्धा तिचाच आहे ! वडील होण्याच्या पार्श्वभूमीवर बोलला जस्टीन बिबर…