Friday, July 25, 2025
Home बॉलीवूड विद्या बालनला किस करताना घाबरायचा ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मी! ‘या’ गोष्टीची होती अभिनेत्याला भीती

विद्या बालनला किस करताना घाबरायचा ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मी! ‘या’ गोष्टीची होती अभिनेत्याला भीती

विद्या बालनला (Vidya Balan) बॉलिवूडची बोल्ड अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. आपल्या भूमिकेत जीव कसा ओतायचा, हे अभिनेत्रीला चांगलेच ठाऊक आहे. तसे तर अभिनेत्रीला बोल्ड भूमिका करण्यात कोणतीही अडचण आली नाही. पण तिला किस करताना बॉलिवूडचा ‘सिरीयल किसर’ इमरान हाश्मीला (Emraan Hashmi) अक्षरशः घाम फुटला होता. पण अभिनेत्याला घाम का फुटला होता, याचे कारण जाणून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

इमरानला होती अडचण
इमरान हाश्मी हा बॉलिवूडचा सर्वात मोठा ‘सिरीयल किसर’ मानला जातो. पण चित्रपटात विद्या बालनला किस करताना मात्र अभिनेत्याची हालत खराब झाली होती. इमरानने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याने अनेक अभिनेत्रींसोबत हॉट सीन्सही दिले आहेत, मात्र विद्या बालनसोबत किसिंग सीन करताना त्याला अडचणीचा सामना करावा लागला. (emraan hashmi was afraid of kissing vidya balan reason was her husband)

किसिंग सीनची वाटायची भीती!
इमरान हाश्मी आणि विद्या बालन यांनी २०१३ मध्ये आलेल्या ‘घनचक्कर’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटात दोघांमध्ये इंटिमेट आणि किसिंग सीन चित्रित करण्यात आले होते. चित्रपट सरासरी राहिला, पण यातील बोल्ड सीन्सने बऱ्याच चर्चा रंगवल्या होत्या. या चित्रपटात विद्या बालनसोबत किसिंग सीन शूट केल्यानंतर इमरान घाबरून जायचा आणि तिला सतत एकच प्रश्न विचारायचा.

स्वतः विद्याने केला होता खुलासा
या चित्रपटाचा निर्माता विद्या बालनचा पती सिद्धार्थ रॉय कपूर होता आणि हेच कारण आहे, ज्यामुळे इमरानला घाम फुटायचा. असे म्हटले जाते की, विद्यासोबत किसिंग सीन शूट केल्यानंतर इमरान तिला विचारायचा की, “सिद्धार्थ काय म्हणेल?”, “तो मला माझा पेमेंट चेक देईल असे तुला वाटते का?” विद्याने हा किस्सा नेहा धुपियाच्या ‘नो फिल्टर’ या चॅट शोमध्ये उघड केला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा