Friday, August 1, 2025
Home बॉलीवूड ईडीकडून करण्यात आली जॅकलिन फर्नांडिसची ५ तास कसून चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण?

ईडीकडून करण्यात आली जॅकलिन फर्नांडिसची ५ तास कसून चौकशी; काय आहे नेमकं प्रकरण?

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस अडचणीत आली आहे. ईडीकडून जॅकलीनची मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी दिल्लीत ५ तास चौकशी करण्यात आली आहे. तर साक्षीदार म्हणून अभिनेत्रीची चौकशी झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा खटला सुकेश चंद्रशेखरशी संबंधित आहे. ज्याच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा या अगोदरच नोंदवण्यात आला आहे. रोहिणी तुरुंगात सुनावणी सुरू असताना सुकेशवर एका व्यावसायिकाकडून एका वर्षात २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. याशिवाय सुकेशच्या विरोधात खंडणीच्या २० तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत.

जॅकलीन सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे. सध्या ती ‘भूत पोलीस’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकताच चित्रपटाचा ट्रेलर आणि एक गाणे रिलीझ करण्यात आले आहे आणि दोघांनाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या चित्रपटात जॅकलिनसोबत अर्जुन कपूर, सैफ अली खान आणि यामी गौतम मुख्य भूमिकेत आहेत. (Actress Jacqueline Fernandez gets into trouble, ED interrogates her for 5 hours)

बॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवण्यासाठी जॅकलिन श्रीलंकेहून भारत आली होती. २००९ मध्ये जॅकलिनने ‘अलादीन’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटात जॅकलिनसोबत रितेश देशमुख मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही. पण जॅकलिनच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली. यानंतर, ती ‘जाने कहां से आई है’ या चित्रपटात दिसून आली. परंतु जॅकलिनला खरी ओळख ‘हाऊसफुल’ या चित्रपटातील ‘धन्नो’ गाण्यामुळे मिळाली. यानंतर ‘मर्डर २’ या चित्रपटात जॅकलिनने तिच्या हॉट अंदाजाने सर्वांना आश्चर्यचकित केले. त्यानंतर तिच्या करिअरचा आलेख वाढतच गेला. जॅकलिनने ‘हाऊसफुल २’, ‘रेस २’, ‘किक’ यांसारखे हिट चित्रपट दिले.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अभिनयात येण्यापूर्वी ‘हे’ काम करायची श्रुती हासन; म्हणाली, ‘कोणालाही माहित नव्हते की…’

-Bigg Boss OTT: लाजून लाल झाली शमिता, जेव्हा करणने ‘हॉटनेस’वर प्रश्न विचारताच राकेश म्हणाला…

-‘टायगर ३’साठी कॅटरिना कैफ रशियाला रवाना; स्टंट सीन शूट करण्यासाठी घेतीये प्रचंड मेहनत

 

हे देखील वाचा