Monday, December 23, 2024
[aioseo_breadcrumbs]

‘ये मैं हू, ये मेरा घर है और यहा…’, राखी सावंतने शेयर केला व्हिडिओ; चाहत्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

यंदाच्या बिग बॉसच्या चौदाव्या पर्वात सर्वात लोकप्रिय ठरलेली राखी सावंत ही या कार्यक्रमामुळे अधिक लोकप्रिय ठरली. राखी भलेही या पर्वाची विजेती झाली नाही, पंरतु बिग बॉसच्या घरात खेळलेल्या खेळीमुळे तिने सर्वांची पसंती मिळवली आहे. त्या घरात तिच्यावर अनेक आरोप लावले गेले, सोबतच तिला अनेक टीकांचा सामना देखील करावा लागला होता. पण सर्व परिस्थितीवर मात करून तिने आपली योग्यता सिद्ध केली आहे. त्या जोरावरच तिला बिग बॉसच्या घरात तिला ‘एंटरटेनर क्वीन’ म्हणून लोकप्रियता मिळाली.

बिगबॉसच्या घरात अंतिम पाच पर्यंत पोहचल्यावर १४ लाख रुपये घेऊन ती घराबाहेर पडली. आता बिगबॉसचा सिझन जरी संपला असला, तरीही ती आपल्या व्हिडिओ किंवा फोटोमार्फत नेहमीच चाहत्यांच्या भेटीला येत असते. बिग बॉस संपल्यावर ती आपल्या आईजवळ पुन्हा परतली असल्याचे दिसून आले. सध्या तिची आई कॅन्सरशी लढतेय. त्याचे फोटो देखील तिने आपल्या सोशल मीडियाद्वारे दाखवले होते. अनेकांनी तिला याबाबत मदतीचे आश्वासन देखील दिले होते.

एकीकडे ती आपल्या आईसाठी दुखी आहे तर, दुसरीकडे इतक्या दुखानंतर देखील प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी एकही संधी सोडत नाहीये. नुकताच तिने आपला एक मजेशीर व्हिडिओ इंस्टाग्रामवर अपलोड केला आहे. जो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ती धुणी- भांडीपासून ते झाडलोट करण्यापर्यंत सर्वच कामे करताना दिसत आहे. साहिजकच बिगबॉसच्या घरात तिला या सर्व गोष्टींची बहुदा सवय लागली असावी. पण हे काम करताना तिला बिगबॉसच्या घरात केलेल्या कामांची नक्कीच आठवण येतेय.

बिग बॉस आणि सलमानने त्या घरात मला गृहिणी बनवून सोडले होते, असे तिचे मत आहे. सोबतच मी सर्व कामे तेथे शिकली असे देखील ती म्हणते. ते पर्व संपले असूनसुद्धा मी अद्यापही वेड्यासारखी माझ्या घरची कामे करतेय आणि जोपर्यंत मी भांडी घासत नाही तोपर्यंत मला रात्री झोप लागत नाही, असे ती म्हणतेय. सोबतच या व्हिडिओमार्फत तिने सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या आहेत.

आपल्या घराची लादी पुसताना राखी व्हिडिओमध्ये म्हणतेय की, “ये मैं हू, ये मेरा घर और ये मेरा पोछा है..और यहा पावरी नहीं हो रहा है, यहां सिर्फ पोछा लग रहा है, और घर साफ हो रहा है.” याशिवाय तिने आणखी एक व्हिडिओ शेयर केला आहे, ज्यात तिला एका चाहत्याकडून मिळालेली भेटवस्तू ती दाखवत आहे. ज्यामुळे तिचा आनंद गगनात मावेनासा झालाय. तिच्या या व्हिडिओंना प्रेक्षकांनी खूप पसंती दर्शविली आहे. तिला मजेशीर प्रतिक्रिया देखील येत आहेत.

आपल्या अनेक वक्तव्यामुळे राखी ही चर्चेचा विषय बनत असते. याशिवाय तिने अनेक चित्रपटात काम केले आहे. ‘अग्नीचक्र’ हा तिचा पहिला चित्रपट. या चित्रपटासोबतच सोबतच राखीने ‘जोरू का गुलाम’, ‘जिस देश मै गंगा रेहता है’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘ये रास्ते है प्यार के’ या चित्रपटात आयटम सॉंग केले आहेत. सन २००५ साली रिलीझ झालेल्या ‘परदेसिया ये सच है पिया’ या रिमिक्स गाण्याने तिला पसंती मिळवून दिली होती.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-नेहा कक्कर अन् गुरु रंधावा प्रथमच आले एकत्र, पाहा या जोडीचे ‘और प्यार करना है’ हे ताजं गाणं

-भारतीय सैनिकाच्या पत्नीच्या व्यथा सांगणारं ‘तुम बिन’ गाणं युट्यूबलर करतंय राडा, हिट्सचा पडतोय पाऊस

-‘१०० लोकांनी १०० वेळा धमक्या दिल्या…’, विकास दुबेच्या एन्काउंटरवरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करताना दिग्दर्शकाचे वक्तव्य

हे देखील वाचा