‘१०० लोकांनी १०० वेळा धमक्या दिल्या…’, विकास दुबेच्या एन्काउंटरवरील चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करताना दिग्दर्शकाचे वक्तव्य

Movie Bikroo Kanpur Gangster Based On Vikas Dubey Encounter Watch Trailer


पोलिसांनी उत्तर प्रदेशातील कुख्यात गुंड विकास दुबेचा १० जुलै २०२० रोजी एन्काउंटर केला होता. त्याने उत्तर प्रदेशातील ८ पोलिसांची हत्या केली होती. आता त्याच्या एन्काउंटरवर आधारित ‘बिकरू कानपुर गँगस्टर’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीझ करण्यात आला आहे. त्याच्या जीवनातील प्रत्येक गोष्ट या चित्रपटात सविस्तररीत्या दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन नीरज सिंग आणि श्रद्धा श्रीवास्तव यांनी, तर चित्रपटाची निर्मिती अजय पाल सिंग आणि सीपी सिंग यांनी केली आहे.

‘संपूर्ण चित्रपटाची शूटिंग आम्ही आग्रा आणि मथुरामध्ये केली आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही विकास दुबे राहत असलेल्या कानपूरमध्येही लोकेशन पाहिले होते. परंतु तिथे शूटिंगसाठी परवानगी मिळण्यात अडचण होती. चित्रपटादरम्यान अनेक समस्या आल्या. १०० लोकांनी १०० वेळा धमकी देणारे फोन केले होते. परंतु ती चेष्टा होती की खरंच गुन्हेगार होते, हे मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. जसा चित्रपटाचा वादग्रस्त कंटेंट आहे, त्यामुळे कानपूरमध्ये परवानगी मिळाली नाही. परंतु निर्मात्यांच्या सहकार्यामुळे हा चित्रपट आम्ही पूर्ण केला आणि शेवटी चित्रपटाचा ट्रेलरही रिलीझ झाला आहे,’ ट्रेलर रिलीझ करताना दिग्दर्शक नीरज सिंग यांनी म्हटले.

या चित्रपटात पंडित म्हणजेच विकास दुबेच्या जीवनात आलेले सन १९९० पासून ते २०२० पर्यंतचे चढ- उतार पाहायला मिळतील. विकास दुबेवर खून, खंडणी यांसारखे अनेक गुन्हे दाखल केले होते. सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे, त्याला अटक करण्यासाठी पोहोचलेल्या ८ पोलिसांची त्याने हत्या केली होती. त्याला अटक केल्यानंतर त्याने म्हटले होते की, ‘मैं विकास दुबे कानपूर वाला.’

या चित्रपटात विकास दुबेची भूमिका अनुभवी अभिनेता निमाई बालीने साकारली आहे. त्याने ‘जय हनुमान’, ‘भाभी’, ‘कुमकुम’, ‘ओम नम: शिवाय’ यांसारख्या मालिकांमध्ये जबरदस्त अभिनय केला आहे.

दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-हॉलिवूड सुपरस्टार टॉम क्रूझ टिक टॉकवर? अभिनेत्याला ओळखण्यात चाहत्यांकडून चूक, पाहा व्हायरल व्हिडिओ

-निरहुआ आणि आम्रपालीच्या जोडीची धमाल, व्हिडिओला मिळाले १ कोटी ३४ लाखांपेक्षाही अधिक व्ह्यूज

-बाहुबलीचा बल्लाळदेव दिसणार ‘हाती मेरे साथी’ सिनेमात, चित्रपटाचा जबराट ट्रेलर झाला रिलीझ


Leave A Reply

Your email address will not be published.