Saturday, January 17, 2026
Home बॉलीवूड अप्सरा आली! लग्नाच्या चर्चेदरम्यान पांढऱ्यासाडीत घराबाहेर स्पॉट झाली कॅटरिना

अप्सरा आली! लग्नाच्या चर्चेदरम्यान पांढऱ्यासाडीत घराबाहेर स्पॉट झाली कॅटरिना

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल हे दोघे लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा होत आहे. जरी अद्याप या बातम्यांना या दोघांकडून कोणताही अधिकृत दुजोरा मिळाला नसला तरी त्यांचे लग्न होणार याची पक्की माहिती मीडियाकडे आहे. मीडियाचे कॅमेरे आणि प्रतिनिधी सतत या लग्नाच्या संबंधित व्यक्तींवर लक्ष ठेऊन आहे. त्यांच्या हालचालींवर पॅपराजी सातत्याने लक्ष ठेवून असल्याने त्यांच्या लग्नाच्या अनेक अपडेट लोकांपर्यंत पोहचत आहे. लग्नाची बातमी समोर आल्यापासून दोघांच्या आयुष्यातील प्रत्येक पैलू चर्चेत आले आहेत. या दोघांचे ७ ते ९ डिसेंबरच्या दरम्यान राजस्थानमध्ये रॉयल वेडिंग होणार आहे. याच लनाच्या बातम्यांमध्ये नुकतीच कॅटरिना कैफ तिच्या घराबाहेर स्पॉट केली गेली.

तिला घराबाहेर पडल्यावर सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळल्या होत्या. कॅटरिना आणि तिची आई सुझान टर्कोट विकी कौशलच्या घरी निघाल्या असताना त्यांचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे. यावेळी कॅटरिना कैफ पांढऱ्या रंगाच्या साडीत दिसली. ज्यात ती अत्यंत सुंदर दिसत होती. विकी कौशलच्या घरी जाताना कॅटरीना कैफने मीडियाला अभिवादन केले. कॅटरिना सोबत तिची आई सुझान टर्कोट देखील दिसली आहे.

त्यावेळी त्यांनी हिरव्या रंगाचा सलवार सूट घातला होता.कॅटरिना तिचा आगामी नवरा विकी कौशाल आणि त्याच्या कुटुंबाला भेटायला निघालेली होती. विकीच्या घरी लग्नाआधीचे काही विधी पूर्ण करण्यासाठी ती त्यांच्या घरी पोहोचली होती. अशी चर्चा आहे की विकी कौशल आणि कॅटरिना कैफ ९ डिसेंबरला विवाहबंधनात अडकणार आहेत. कॅटरिना आणि विकी सवाई माधोपुर मधील सिक्स सन्स फोर्ट बारवाडा येथे सात फेरे घेणार आहेत. कॅटरिना आणि विकीच लग्न बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे पण आत्तापर्यंत दोघांनी या बातम्यावर मौन बाळगले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-अशोकमामांसोबत ‘गंमत जंमत’ चित्रपटात झळकलेल्या ‘चारुशीला साबळे’ नंतर इंडस्ट्रीतून अचानक झाल्या गायब, आज आहे…

-तिसऱ्या आठवड्यातही ‘झिम्मा’ हाऊसफुल, सिद्धार्थ चांदेकरने सोशल मीडियावर केला व्हिडिओ शेअर

‘मीरा आणि मनू’ने धरला ‘नाटु नाटु’ गाण्यावर ठेका, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

हे देखील वाचा