बाॅलीवूड आभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा नेहमीच त्याच्या दर्जेदार अभिनयामुळे प्रेक्षकांवर प्रभाव पाडतो. काही दिवसांपुर्वी त्यांचा ‘८३’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. कोरोनाच्या भीतीने काही प्रेक्षक चित्रपटगृहात पोहचू शकले नाहीत. अशातच आता चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रसारित होण्याची वाट बघितली जात आहे. परंतु चित्रपटाच्या टीमने हा निर्णय घेतला आहे की, चित्रपट ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रसारित न होता अगोदर टीव्हीवर प्रसारित केला जाईल.
रणवीर सिंग आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचा वर्ल्ड टीवी प्रीमियर २० मार्च रोजी रात्री ८ वाजता स्टार गोल्डवर प्रसारित होणार आहे. वृत्तानुसार स्टार गोल्डवर चित्रपटाच्या प्रसारनादरम्यान त्याच जाहिराती प्रसारित केल्या जातील, ज्या १९८३च्या काळात टीव्हीवर येत होत्या. चॅनलचे म्हणणे आहे की, लोकांना घरी बसुन ‘८३’ चे वातावरण अनुभवचा यायला हवे.
म्हणजेच २० मार्चला प्रेक्षकांना त्या वर्ल्डकपच्या बाबतीत माहिती मिळेलच, परंतु त्यांना त्यावेळेच्या जाहिरातीबद्दलही माहिती मिळेल. १९८३ च्या लोकांना चित्रपट आणि जाहिरीतीच्या माध्यमातून त्यांच्या आठवणीला उजाळा दिला जाईल. जेव्हा भारतीय क्रिकेट संघाने पहिल्यांदा विश्वकप जिंकून आपल्या देशाच नाव मोठे केले होते.
रणवीर व्यतरिक, या चित्रपटात दीपिका पादुकोण, ताहिर राज भसीन, झीवा, साकिब सलीम, जतिन सरना, चिराग पाटील, दिनकर शर्मा, निशांत दहिया, हार्डी संधू, साहिल खट्टर, एम्मी विर्क, आदिनाथ कोठारे, धैर्य कारवां, आर बद्री आणि पंकज यासारखे कलाकार आहेत.
हेही वाचा