×

अन् दोन अज्ञात व्यक्तींनी एकता कपूरला बंदूक दाखवून केले किडनॅप, व्हायरल व्हिडिओ आला समोर

हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आणि प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिचा सोशल मीडियाशी खूप जवळचा संबंध आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकवेळा ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासोबतच तिच्या व्यावसायिक आयुष्याबाबत देखील माहिती देत असते. तिच्या आगामी प्रोजेक्टबाबत देखील ती तिच्या चाहत्यांना माहिती देत असते. परंतु यावेळी एकता कपूर जरा वेगळ्या कारणामुळे चर्चेत आहे.

एकता कपूरचा (Ekta kapoor) एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात दोन नकाब पोश अचानक तिच्या जवळ येतात आणि तिच्यावर बंदूक रोखतात. ती सोमवारी (२१ फेब्रुवारी) रोजी संच्यकळी मुंबईला मलाड येथील बालाजी ऑफिसमधून निघाली होती. तेव्हा ती एका ठिकाणी पॅपराजींना स्पॉट झाली आणि ती त्यांना फोटोसाठी पोझ देत होती. त्यावेळी दोन नकाब पोस तिथे येतात आणि तिच्यावर बंदूक रोखतात. यावेळी दुसरा एक व्यक्ती  कॅमेरा बंद करायला लावतात.

हा सगळा प्रकार पाहून एकता खूपच घाबरते आणि तिच्या गाडीत जाऊन बसते. त्यावेळी दुसरा व्यक्ती फोटोग्राफर म्हणतो की, “कॅमेरा बंद कर.” हे सगळं पाहून आजूबाजूचे लोक ओरडू लागतात आणि म्हणतात की, “हेल्प हेल्प पोलिसांना बोलवा.” तोपर्यंत त्या गुंडांनी एकता कपूरला गाडीत बसवलं आणि तिला घेऊन फरार झाले. हा व्हिडिओ पाहून सगळेच खूप घाबरले होते.

https://www.instagram.com/tv/CaPf3ToFUCb/?utm_source=ig_web_copy_link

अनेकांना असे वाटते की, हा एक प्रॅं क व्हिडिओ आहे. जो कदाचित जाणूनबुजून केला आहे. एकता कपूरचा नवीन लॉकअप हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे ती कदाचित मुद्दाम असे करून तिच्या शोचे प्रमोशन करत आहे, असे देखील अनेकांना वाटत आहे. त्यामुळे युजर देखील या व्हिडिओवर कमेंट करून हा व्हिडिओ खरा आहे का असा प्रश्न उपस्थित करत आहेत? अनेकजण या व्हिडिओला फेक आहे असे म्हणत आहेत.

एकता कपूरच ‘लॉक अप’ हा शो २७ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच अभिनेत्री कंगना रणौवत ही या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. अशी देखील चर्चा चालू आहे.

एकता कपूरने टेलिव्हिजनवरील अनेक मालिकांची निर्मिती केली आहे. तिच्या मालिकांनी प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद देखील मिळाला आहे. तिने ‘पवित्र रिश्ता’, ‘कुकुम भाग्य’, ‘कुंडली भाग्य’ यांसारख्या मालिका तयार केल्या आहेत. आता तिच्या या नवीन शोची सगळ्यांना आतुरता लागली आहे.

हेही वाचा :

 

Latest Post