Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड सलमानची ‘जुडवा’ फेम अभिनेत्री आता दिसते ‘अशी’, तर ‘या’ कारणामुळे गेली होती इंडस्ट्रीपासून लांब

सलमानची ‘जुडवा’ फेम अभिनेत्री आता दिसते ‘अशी’, तर ‘या’ कारणामुळे गेली होती इंडस्ट्रीपासून लांब

सलमान खानसोबत अनेक अभिनेत्रींनी बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये एन्ट्री केली. त्यामधीलच एक अभिनेत्री रंभा ही ९०च्या दशकात खूप लोकप्रिय झाली होती. रंभाने बॉलिवूडमधील सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि ती अजूनही चाहत्यांच्या मनामध्ये घर करून आहे. अभिनेत्रीचे चाहते तिचा ‘जुडवा’ हा चित्रपट कसे काय विसरू शकतात! ज्यामध्ये सलमान खानसोबत तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना खूप आवडले होती. ती ‘बंधन’ या चित्रपटातही सलमानसोबत झळकली होती.

रंभाच्या अभिनयाला मिळाली वाहवा!
रंभाने ‘जुडवा’ चित्रपटामध्ये रूपाची भुमिका साकारली होती. जी आजवर प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. या चित्रपटातील रंभाचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला होता. याच कारणामुळे तिला बॉलिवूडच नाही, तर मल्याळम, तेलूगु ,तमिळ ,कन्नड, भोजपुरी आणि बंगाली या इंडस्ट्रीमध्ये काम करण्याची संधी मिळाली. गेल्या काही वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीपासून दूर गेली असली, तरी प्रेक्षकांच्या आठवणीतीत अजूनही तशीच आहे.

मल्याळम चित्रपटातून केली करिअरला सुरुवात
खूप कमी लोकांना माहिती आहे, की रंभाचं खरं नाव ‘विजयलक्ष्मी’ आहे. तिने बॉलिवूडसोबतच साउथ चित्रपटांमध्येही खूप नाव कमावले आहे. रंभा ५ वर्षांची असताना, तिने ‘सरगम’ या मल्याळम चित्रपटात काम केले. या चित्रपटापासून तिने आपल्या करिअरला सुरुवात केली. त्यानंतर ‘आ ओक्कती अदक्कू’या तेलुगू चित्रपटामध्ये तिने काम केले.

लग्नानंतर गेली इंडस्ट्री पासून दूर
माध्यमातील वृत्तानुसार, रंभाने साउथ चित्रपटामध्ये २०१० पर्यंत काम केले. २०१० मध्ये तिने बिझनेसमॅन इंद्रकुमार पथ्मनाथन याच्या सोबत लग्न केले आणि कॅनडा येथे राहायला गेली होती. ती टोरंटो येथे राहत आहे. लग्नानंतर रंभा चित्रपटसृष्टी पासून दूर गेली, कारण तिला चित्रपटांमध्ये चांगल्या भुमिका मिळणे बंद झाले होते. शिवाय तिने अनेक तमिळ आणि तेलुगू शोचे परिक्षण केले आहे.

 

रंभा आता तीन मुलांची आई आहे. तिला दोन मुली आणि एक मुलगा आहे. ती सोशल मीडियावर सक्रिय असते. आपल्या जीवनातील काही क्षण ती फोटोद्वारे चाहत्यांसोबत शेअर करते. ज्याला नेटकरी भरभरून लाईक्स देतात.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुणाल गांजावाला रसिकांसाठी घेऊन आला ‘भन्नाट पोरगी’, पाहायला मिळाली निक अन् सानिकाची रोमँटिक केमिस्ट्री

-जुही चावलासोबत सनी देओलचा रोमान्स; पाहून ढसाढसा रडला होता करण देओल, खुद्द अभिनेत्याचा खुलासा

-पती राजकुमार रावला निरोप देताना विमानतळावरच भावुक झाली पत्रलेखा, अभिनेत्यानेही दिली लक्षवेधी प्रतिक्रिया

हे देखील वाचा