Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर वडिलांच्या आठवणीत भावुक होऊन लता दीदींची ‘ही’ होती सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट

वडिलांच्या आठवणीत भावुक होऊन लता दीदींची ‘ही’ होती सोशल मीडियावरील शेवटची पोस्ट

प्रत्येक संगीत रसिकाच्या हृदयात निवास करणाऱ्या स्वरालीका, भारतरत्न लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. दिग्गज गायिका यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. लताजींचे निधन हा केवळ सिनेसृष्टीला नाही तर त्यांच्या चाहत्यांनसाठी सुद्धा मोठा धक्का आहे. त्यांच्या निधनाने देशभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आवाजातच अशी जादू होती की, कोणीही त्यांचं कौतुक केल्याशिवाय राहू शकत नव्हतं.

लताजी ९२ वर्षांचं होत्या, एवढं वय असून सुद्धा त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असायच्या. त्यांच्या जाण्याने त्यांच्या आठवणीने डोळे ओलावत आहेत. लताजीनी त्यांच्या इंस्टाग्राम पोस्टवर असं लिहिलं होतं की, त्यांचे वडील आणि जेष्ठ संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्यावर खूप जीव होता. त्यांच्या अत्यंत यशस्वी आणि अलंकृत कारकिर्दीचे श्रेय हे नेहमी त्यांचं दिले जायचे.

लताजी याना मुंबईच्या ब्रीच कँडी दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्यांनी इंस्टाग्रामवर स्वतःचा एक थ्रोबॅक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यामध्ये त्या आपल्या वडिलांची आठवण करून भावुक झाल्या होत्या. हा व्हिडिओ कोणत्यातरी कार्यक्रमातून आला आहे आणि लताजी आपल्या वडिलांबद्दल सांगत आहेत. या व्हिडिओमध्ये लता अत्यंत नम्रतेने म्हणतायेत की, “माझ्या वडिलांनी आम्हाला इतकया मोठ्या जगात एकटेच सोडले. पण ते नेहमीच माझ्यासोबत आहे असं मला वाटतं. कधी कधी वाटायचं की, ते माझ्या शेजारी बसून मला गाणं शिकवत आहे. मला कधी कोणत्यापण गोष्टीची भीती वाटली की मला वाटायचं ते माझ्या डोक्यावर हाथ ठेऊन म्हणायचे – भिऊ नकोस लता, मी आहे ना. असेच आमचे पन्नास वर्ष गेली. जर तेव्हा ते माझ्यासोबत नसते, तर माझ्यासारख्या छोट्या गायकाची कल्पना करा एवढी प्रसिद्धी मिळाली असता का? त्यांचा याच आशीर्वादाने मला आज असे नाव मिळाले.”

दीनानाथ मंगेशकर हे मराठी अभिनेते तसेच जेष्ठ शास्त्रीय संगीतकार होते. लता मंगेशकर या त्यांच्या थोरल्या लेक होत्या. दीनानाथ मंगेशकर यांनी वयाच्या ४२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. त्यावेळी लताजी अवघ्या १३ वर्षाच्या होत्या. लताजींना वडिलांची फारशी साथ मिळाली नसेल, पण त्यांचा पूर्ण तसा लालाजींच्या व्यक्तिमत्वावर पाहायला मिळतो. लताजींच्या इंस्टाग्राम अकाउंटवर त्यांच्या वडिलांच्या आठवणी आहेत.

मागच्या वर्षी २९ डिसेंबरला जेष्ठ संगीतकार दीनानाथ मंगेशकर यांच्या जयंतीदिनी लताजींनी त्यांच्या वडिलांचे फोटो शेअर केला होता आणि असं लिहिलं की, “नमस्कार, आज माझे सद्गुणी वडील गायक दीनानाथ मंगेशकर यांची जयंती आहे. आपण सर्व मंगेशकणा नेहमी त्यांचे आशीर्वाद मागतो आणि त्यांच्या पावन चरणी नतमस्तक होतो व त्यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.”

हेही वाचा :

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा