Monday, July 1, 2024

ईशा गुप्ताने केला ‘बाबां’बद्दल मोठा खुलासा; म्हणाली, ‘मी एका बाबा भेटले होते, ज्याने…’

ईशा गुप्ता (Esha Gupta) सध्या तिच्या ‘आश्रम ३’ या वेब सीरिजमुळे चर्चेत आहे. बॉबी देओल (Bobby Deol) अभिनित ‘आश्रम ३’ मध्ये येऊन, ईशाने वेब सीरिजमध्ये एक नवीन ट्विस्ट जोडला आहे, ज्याला चाहत्यांनी चांगलेच पसंत केले आहे. या सीरिजमध्ये ती बाबा बनलेल्या बॉबी देओलसोबत रोमान्स करताना दिसत असली, तरी खऱ्या आयुष्यात तिचा बाबावर विश्वास नाही. अलीकडेच या अभिनेत्रीने याबाबत खुलासा केला आहे.

ईशा गुप्ताचा बाबांबाबत मोठा खुलासा
‘आश्रम ३’ची सोनिया म्हणजेच ईशा गुप्ता हिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे की, तिचा बाबांवर विश्वास नाही. अभिनेत्री म्हणाली, “माझा आस्था आणि धर्मावर विश्वास आहे. मी देव मानते, पण बाबांवर विश्वास नाही. मला माझ्या आयुष्यात एकदा एक बाबा भेटले, ज्यांनी मला सांगितले की तुम्ही ठराविक रक्कम द्या आणि मग मी तुमची पूजा करेन आणि तुम्हाला विधीसाठी पूजेत सामील होण्याचीही गरज नाही. म्हणजे, अशी कोणती पूजा आहे, जिथे मी उपस्थित राहू शकत नाही. मात्र, असेही काही लोक आहेत जे तुमची सेवा करतात, तुमच्याकडून एक रुपयाही घेत नाहीत आणि तुमच्यासाठी प्रार्थना देखील करतात.” (esha gupta gave statement on godmen)

‘आश्रम’ ही प्रकाश झा निर्मित वेब सीरिज आहे, ज्याच्या तिसऱ्या सीझनला पहिल्या आणि दुसऱ्या सीझनप्रमाणेच प्रेम मिळत आहे. या वेब सीरिजमध्ये बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहे. लोकांची फसवणूक करणाऱ्या बाबा निरालाची भूमिका तो यात साकारत आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा