सिनेसृष्टीमधे अनेक अभिनेत्री त्यांचे करिअर बनवण्यासाठी येतात. मात्र, या क्षेत्रात सगळ्याच यशस्वी होतात असे नाही. काही अभिनेत्री पदार्पण खूपच दणक्यात करतात. मात्र, नंतर त्यांची गाडी मध्ये थांबते. असे असूनही त्या अभिनेत्रींची लोकप्रियता काही कमी होत नाही. सोशल मीडियावर त्यांची क्रेझ तुफान बघायला मिळते. अशीच एक अभिनेत्री आहे ईशा गुप्ता.
ईशाने २०१२ साली ‘जन्नत २’ सिनेमातून बॉलिवूड दमदार पदार्पण केले. मात्र, तिची गाडी थांबत थांबत पुढे गेली. आज जरी ईशा चित्रपटांमध्ये कमी दिसत असली, तरीही ती सोशल मीडियावर कमालीची सक्रिय आहे. सोशल मीडियावर तिचे फोटो, व्हिडिओ ती नेहमीच शेअर करताना दिसते. सोबतच ती तिचे योगा फोटो देखील शेअर करते. ईशाच्या फोटोंमध्ये तिचे बोल्ड फोटोंचे प्रमाण खूप आहे.
ईशाने नुकताच तिचा एक बिकिनीमधील पाठमोरा फोटो शेअर केला आहे. तिचा हा फोटो फोटो अतिशय सुंदर असून एका योर्टवर काढला आहे. या फोटोमध्ये जरी ईशाचा चेहरा दिसत नसला, तरीही तिची परफेक्ट फिगर दिसत आहे. तिचा हा फोटो तुफान व्हायरल होत असून, तिच्या या फोटोला २ लाखांपेक्षा अधिक लाईक्स मिळाले आहेत. सोबतच फॅन्सकडून जबरदस्त कमेंट्स येत आहेत.
यात काहींनी फायर ईमोजी पोस्ट केल्या आहेत, तर काहींनी तिला ‘हॉट’ म्हटले आहे. ईशाला इंस्टाग्रामवर ५ मिलियनपेक्षा अधिक फॉलोवर्स आहेत.
ईशा नेहमी तिच्या फिट बॉडीचे श्रेय स्पोर्ट्सला आणि योगाला देताना दिसते. २००७ साली ईशाने मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला आणि त्यानंतर तिने अभिनयाच्या क्षेत्रात एन्ट्री केली. आज ईशा सिनेमात जरी कमी दिसली तरी ती अनेक जाहिरातीमध्ये दिसत असते. शिवाय ती फॅशन शोमध्ये सुद्धा बऱ्याचदा दिसते. ईशा शेवटची २०१९ साली आलेल्या ‘टोटल धमाल’ या सिनेमात दिसली होती.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-