‘नौटंकी साला’, ‘यह जवानी है दीवानी’, ‘यारियां’, ‘मैं तेरा हीरो’, जॅक एंड जील’ आणि ‘साहो’ यांसारख्या चित्रपटात शानदार अभिनय करून बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळीच छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे एवलिन शर्मा. तिने १५ मेला तिचा बॉयफ्रेंड तुषान भिंडी याच्यासोबत ऑस्ट्रेलियामधील ब्रिटन येथे लग्न करून सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. लग्नाच्या अवघ्या दोनच महिन्यानंतर एवलिनने गोड बातमी शेअर केली आहे. तिने सांगितले की, ती आई होणार आहे. १२ जुलैला तिचा वाढदिवस आहे. या वाढदिवशी हे तिच्यासाठी एकदम बेस्ट गिफ्ट असणार आहे. (Evelyn Sharma and her husband tushaan bhindi are going to welcome their first child)
एवलिन शर्मा आणि ऑस्ट्रेलियन सर्जन तुषान भिंडी यांच्या घरी लवकरच चिमुकली पाऊल चालणार आहेत. तिने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून तिने कॅप्शन दिले आहे की, “तुला माझ्या कवेत घेण्यासाठी मी जास्त वाट नाही पाहू शकत.”
बॉम्बे टाईम्ससोबत बोलताना तिने ही गूड न्यूज शेअर केली आहे. तिने सांगितले की, तिच्या प्रेग्नंसीने तिचा वाढदिवस आणखीन स्पेशल केला आहे. तिने सांगितले की, “मला मी चंद्रावर असल्याचा भास होत आहे. यापेक्षा चांगले बर्थडे गिफ्ट असूचं शकत नाही. आम्ही अशी आशा करतो की, आम्ही आमच्या बाळाला घेऊन आमच्या कुटुंबाला आणि मित्रांना भेटू शकतो.”
ती म्हणाली की, “ही आमच्या दोघांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. माझ्या वाढदिवसाला पाहिजे होते त्यापेक्षाही हे खूप सुंदर गिफ्ट आहे. आम्ही भविष्यातील प्रत्येक क्षणासाठी तयार आहोत.” तसेच तिने सांगितले की, त्यांच्या बाळाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्येच होणार आहे.
एवलिनने तिचा पती तुषान भिंडीबाबत बोलताना सांगितले की, “आम्हाला दोघांनाही निसर्ग खूप आवडतो. आम्ही सोबत एकदम खुश असतो. आयुष्यात नेहमी तेच करा, जे करताना तुम्हाला प्रेम मिळेल. प्रत्येक क्षण खूप किमती आहे. हे दिवस वाया घालवू नका.”
एवलिन आणि तुषार एकमेकांना २०१८ पासून ओळखतात. एक वर्षाच्या मैत्रीनंतर तुषानने एवलिनला प्रपोज केले होते. त्यांनी ऑक्टोंबर २०१९ मध्ये साखरपुडा केला होता आणि याच वर्षी कोणालाही काहीच न कळवता त्यांनी लग्न देखील केले.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-