नऊ वर्षांपूर्वी विकी कौशलने दिले होते त्याचे पहिले ऑडिशन; आज आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये केली जाते गणना


आजच्या पिढीतील प्रतिभावान अभिनेता म्हणून विकी कौशल ओळखला जातो. त्याने त्याच्या अभिनयाने आणि त्याच्या व्यक्तिमत्वाने सर्वाना भुरळ घातली आहे. या ग्लॅमर जगात येऊन स्वतःच्या हिमतीवर शून्यातून जग निर्माण करणारा विकी ,आज तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनला आहे. आज विकीला आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणले जाते. मागील काही काळापासून विकी कॅटरिना कैफसोबत असणाऱ्या त्याच्या अफेयरच्या बातम्यांमुळे सतत प्रकाशझोतात आहे. मात्र विकी अजून एका वेगळ्या गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. ती गोष्ट म्हणजे त्याने पोस्ट केलेला त्याचा जुना फोटो.

विकीने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून त्याचा एक ९ वर्षांपूर्वीचा जुना फोटो पोस्ट केला आहे. १० जुलै २०१२ ला विकीने त्याच्या आयुष्यातील पहिले ऑडिशन दिले होते. त्यावेळचा त्याचा हा फोटो आहे. या फोटोमध्ये विकीच्या हातात एक पांढऱ्या रंगाचा बोर्ड दिसत आहे. या बोर्डवर विकीची संपूर्ण माहिती लिहिली आहे. हा फोटो पोस्ट करताना त्याने लिहिले, “आजच्याच दिवशी ९ वर्षांपूर्वी धन्यवाद.”

या ९ वर्षांपूर्वीच्या फोटोमध्ये आणि आज विकीमध्ये मोठा फरक जाणवून येत आहे. एक सक्षम अभिनेत्यासोबतच तो आता अधिक आकर्षक दिसत आहे. आजच्या घडीच्या टॉपच्या अभिनेत्यांमध्ये विकीची गणती होते. अतिशय छोट्या मात्र दर्जेदार चित्रपटांमुळे विकीचे करियर ओळखले जाते. अभिनयासोबतच हॉट लुक्स, सुंदर चेहरा, आकर्षक बॉडी आणि त्याहीपेक्षा जबरदस्त टॅलेंट या सर्वांचे कॉम्बिनेशन विकीमध्ये दिसते.

विकी कौशलने त्याच्या सुरुवातीच्या काळात अनुराग कश्यपच्या ‘गँग्स ऑफ वासेपूर’ सिनेमात सहायक दिग्दर्शकाची भूमिका साकारली होती. त्यानंतर त्याला नीरज घेवान यांनी त्यांच्या २०१५ साली आलेल्या ‘मसान’ सिनेमात मुख्य भूमिका दिली. या सिनेमातील भूमिकेसाठी विकीला सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता हा पुरस्कारही देण्यात आला आहे. ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ चित्रपटातून त्याने चाहत्यांच्या मनात नाव कोरले. या सिनेमासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले.

‘राझी’, ‘संजू’, ‘रमन राघव २.०’, ‘उरीः द सर्जिकल स्ट्राइक’, ‘मनमर्जिया’, ‘भूत’ आदी चित्रपटांमधून त्याने त्याच्या जिवंत अभिनयाचे दर्शन सर्वांना घडवले आहे. आगामी काळात विकी ‘तख्त’, ‘द इम्मॉर्टल अश्वत्थामा’, ‘मिस्टर लेले’ ‘सरदार उधम सिंग’, ‘फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ’ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुटूंब-मित्रांना तिचे मॉर्फ्ड केलेले अश्लील फोटो पाठवून, अज्ञात लोकं प्रत्युषा पॉलला देत आहेत बलात्काराच्या धमक्या

-पहिला चित्रपट सुपरहिट, तरीही अभिनयापासून दूर आहे अभिनेता; वाचा कुमार गौरवबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-गोड बातमी! हरभजन सिंग अन् गीता बसरा यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; जोडप्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.