जोर धरू लागलीय फरहान अख्तरनच्या ‘तूफान’ला बॉयकाट करण्याची मागणी; ट्विटरवर ट्रेंड होतोय #boycotttoofaan


बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तर हा त्याचा आगामी चित्रपट ‘तूफान’मुळे सध्या जोरदार चर्चेत आहे. सर्वत्र त्याच्या चित्रपटाची चर्चा चालली आहे. तसेच या चित्रपटात त्याने घेतलेल्या मेहनतीचे देखील सर्वत्र कौतुक चालले आहे. त्याचा हा चित्रपट १६ जुलैला प्रदर्शित होणार आहे. पण प्रदर्शित होण्याआधीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. सोशल मीडियावर फरहानचा हा चित्रपट बॉयकाट करण्याची मागणी केली जात आहे. ट्विटरवर देखील #boycotttoofaan ट्रेंड होत आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटावर लव्ह जिहाद पसरवण्याचा आरोप लावला आहे. (Farhan Akhtar’s film toofaan accused of spreading love jihad before release)

ट्विटरवर देखील लोक लागोपाठ पोस्ट करून या चित्रपटाला विरोध दर्शवत आहेत. नुकतेच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये एक मुस्लिम मुलगा आणि एक हिंदू मुलीमध्ये प्रेम दाखवले आहे. याला प्रेक्षकांनी विरोध दर्शवला आहे. यावर एका युजरने ट्विट करून लिहिले की, “बॉलिवूडच्या निशाण्यावर केवळ हिंदूच नाही, तर ते लव्ह जिहादला देखील उभारी देतात. एवढे सगळे चित्रपट आहेत ज्यात मुलगी नेहमी हिंदू असते. हे लोक मनोरंजनाच्या नावाखाली हिंदूंवर निशाणा साधत आहेत.”

दुसऱ्या एका युजरने लिहिले की, “१६ जुलैला फरहान अख्तरचा ‘तूफान’ हा चित्रपट येणार आहे. त्यांनी सीसीएवर बहिष्कार टाकला होता. आता त्याच्या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचा आपली वेळ आली आहे.”

‘तूफान’ हा चित्रपट १६ जुलै २०२१ रोजी अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित होणार आहे. यात डोंगरी भागातील अजीज अली उर्फ अज्जू भाई नावाच्या एका गुंडाची खेळावरील प्रेरणादायी कहाणी दाखवली आहे. ही कहाणी अजीज अलीच्या बॉक्सिंगवर आधारित आहे. ज्याला आधी बॉक्सिंगमधून पाच वर्षासाठी बाहेर काढलेले असते. पण त्यानंतर तो पुन्हा तयारी करून बॉक्सिंगच्या रिंगणात उतरतो हे दाखवले आहे.

या चित्रपटात फरहान अख्तरसोबत मृणाल ठाकूर, परेश रावल, सुप्रिया पाठक कपूर, हुसैन दलाल, मोहन आगाशे, दर्शन कुमार आणि विजय राज महत्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. एक्सेल एंटरटेनमेंट आणि ROMP पिक्चर्स निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन ओम प्रकाश मेहरा यांनी केले आहे. ‘तूफान’ हा चित्रपट भारतासोबत २४० देशात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-कुटूंब-मित्रांना तिचे मॉर्फ्ड केलेले अश्लील फोटो पाठवून, अज्ञात लोकं प्रत्युषा पॉलला देत आहेत बलात्काराच्या धमक्या

-पहिला चित्रपट सुपरहिट, तरीही अभिनयापासून दूर आहे अभिनेता; वाचा कुमार गौरवबद्दल कधीही न ऐकलेल्या गोष्टी

-गोड बातमी! हरभजन सिंग अन् गीता बसरा यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचे आगमन; जोडप्यावर होतोय शुभेच्छांचा वर्षाव


Leave A Reply

Your email address will not be published.