Saturday, June 29, 2024

मुलीला स्तनपान करताना समोरून क्लिक केला फोटो, अभिनेत्रीच्या पोझमुळं उडाला गोंधळ!

बॉलिवूड अभिनेत्री एवलिन शर्मा (Evelyn Sharma) सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अभिनेत्रीने अचानक लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केले आणि लग्नानंतर ती आधीच गर्भवती असल्याचे आढळून आले. १२ नोव्हेंबर २०२१ रोजी एवलिनने मुलीला जन्म दिला आणि तेव्हापासून ती तिच्या मुलीचे फोटो शेअर करत असते. पुन्हा एकदा अभिनेत्रीने एक फोटो शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.

स्तनपानाचा फोटो केला शेअर
एवलिन शर्माने तिच्या इंस्टाग्रामवर स्तनपान करतानाचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोवर काही युजर्स तिचे कौतुक करत आहेत, तर काहीजण तिला टोमणेही मारत आहेत. एवलिन अनेकदा स्तनपान करतानाचे फोटो शेअर करते, ज्यामुळे तिला ट्रोल देखील केले जाते. पण असे फोटो शेअर करायला एवलिन कधीच मागेपुढे पाहत नाही. (evelyn sharma shared breastfeeding photo people trolled her)

गेल्या वर्षी दिला मुलीला जन्म
एवलिन शर्मा आपल्या मुलीसोबतचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत असते. अभिनेत्रीचे हे पहिलेच अपत्य आहे. एवलिनने नोव्हेंबर २०२१ मध्ये एका मुलीला जन्म दिला. अभिनेत्रीने १५ मे २०२१ रोजी तुषान भिंडीसोबत लग्न केले होते. मुलीच्या जन्मानंतर अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने एवा रानिया भिंडीला जन्म दिला. यासोबतच तिने आपल्या मुलीला किस करतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि लिहिले, “माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे पात्र. एवा रानिया भिंडीची आई.”

एवलिनचे चित्रपट
१२ जुलै १९८६ रोजी जन्मलेल्या एवलिन शर्माचा जन्म फ्रँकफोर्ट, जर्मनी येथे झाला. एवलिनची आई जर्मन आणि वडील भारतीय आहेत. एवलिनला तिच्या कॉलेजच्या दिवसांपासून मॉडेलिंगची आवड होती आणि तिने काही सौंदर्यप्रसाधनांसाठी मॉडेलिंगही केले होते. ‘फ्रॉम सिडनी विथ लव्ह’ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले पण लोक तिला ‘यारिया गर्ल’ म्हणून ओळखतात. याशिवाय ‘ये जवानी है दिवानी’ या चित्रपटातही तिने छोटी भूमिका केली होती.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा